ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Ration Card | रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! आता ‘ही’ रेशन कार्ड होणार बंद, लाभ घेतल्यास होणार थेट कारवाई

Ration Card | रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे लाखो रेशन कार्ड (Ration Card Update) धारकांना फटका बसणार आहे. तसेच ज्या रेशन कार्ड लाभार्थ्यांना स्वतःच्या इच्छेने आपले रेशन (Financial) बंद करायचे असेल त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण मोहीम राबवण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात रेशन कार्ड (Ration Card) धारकांना या मोहिमेचा काय फायदा होऊ शकतो आणि कोणत्या रेशन कार्डधारकांना फटका बसू शकतो.

25 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम
काही रेशन कार्डधारक ज्यांना या कमी दरात मिळणाऱ्या रेशनवरील अन्नधान्याची गरज नाही. त्या लाभार्थ्यांसाठी 25 फेब्रुवारीपर्यंत एक विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यांना आपल्या स्वतःच्या इच्छेने रेशन कार्ड (Ration Card) अन्नधान्य सोडण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत लाभार्थ्यांना स्वतःच्या इच्छेने अन्नधान्य सोडता येणार आहे.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून जमीनधारक शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 30 हजार, जाणून घ्या सविस्तर..

भरावा लागेल फॉर्म
एलपीजी गॅसची सबसिडी (LPG Gas Subsidy) नको असलेल्या लाभार्थ्यांना मला एलपीजीची सबसिडी नको असा फॉर्म भरावा लागत होता. त्याचप्रमाणे आता ज्या लाभार्थ्यांना हे अन्नधान्य नको आहे, त्यासाठी त्यांना ‘गिव्ह इट अप’ या नावाचा फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म भरून स्वतःच्या इच्छेने आपले अन्नधान्य हे रेशन कार्डधारक बंद करू शकतात.

वाचा: सरकारचा मोठा निर्णय! 15 दिवसांनी ‘या’ सरकारी बँकेची होणार विक्री; खरेदीदारांना होणार फायदा

कोणते रेशन होणारं बंद?
रेशन कार्डवरील सर्व लाभार्थी लाभार्थ्यांचे आधार कार्ड रेशन कार्डला लिंक (सिडींग) (Ration Card Aadhaar Link) करणे अनिवार्य आहे. मात्र, वारंवार अपडेट निघूनही अनेक लाभार्थ्यांनी ही लिंकिंग प्रक्रिया केलेली नाही. तरी देखील हे नागरिक रेशन अन्नधान्याचा लाभ घेत आहेत. या लाभार्थ्यांचे अन्नधान्य थेट बंद होणार आहे. तसेच जर या लाभार्थ्यांनी लाभ घेतला तर त्यांच्यावर थेट कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना जर या रेशन कार्ड अन्नधान्याचा लाभ घ्यायचा असेल, तर आधार सिडिंग करून घेणे महत्त्वाचे आहे अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big news for ration card holders! Now ration card will be closed, direct action will be taken if the benefit is availed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button