ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Aadhar Pan Link date| सावधान ! आधार – पॅन लिंक मध्ये झाली मुदत वाड; जाणून घ्या नवीन तारीख..

Aadhar Pan Link Date | कुठल्याही सरकारी कामासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन महत्त्वाची कागदपत्रे मानली जातात. दरम्यान सरकारने सर्व करदात्यांना पॅन नंबर आधार कार्डला लिंक करणे अनिवार्य केले आहे. यासाठी ठराविक मुदत देखील देण्यात आली होती. मात्र सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅन नंबर आधार नंबरशी लिंक करण्याची मुदत वाढवली आहे.

30 जूनपर्यंत वाढवली मुदत

ही मुदत 30 जून पर्यंत वाढवली गेली असून सर्वांनी लवकरात लवकर पॅन नंबर आधार नंबर सोबत लिंक करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने ( Central Board Of Direct Tax) ही मुदत सलग पाचव्यांदा वाढवली आहे.

आधार-पॅन लिंक करणे अनिवार्य आहे

खरंतर, आयकर कायदा 1961 च्या कलम 139AA नुसार, ज्यां करदात्यांकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड (Aadhar Card & Pan Card) ही दोन्ही ओळखपत्रे आहेत, त्यांना ही दोन्ही कार्डे एकमेकांना लिंक करणे अनिवार्य आहे. यासाठी आता 30 जून ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व करदात्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करून घ्यावे.

तर कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाही

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या नियमानुसार 30 जून नंतर तुमचे पॅन कार्ड काम करणार नाही. तसेच तुम्ही कोणत्याही प्रकारचे मोठे आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. दरम्यान CBDT ने तारीख वाढवून लोकांना दिलासा दिला आहे.

असे करा आधार-पॅन लिंक

1) आयकर ई-फायलिंग वर जाऊन होमपेजवरील क्विक लिंक्स वर क्लिक करा.
2) याठिकाणी लिंक आधार वर क्लिक करा.
3) यानंतर तुमची आधार-पॅन लिंक रिक्वेस्ट UIDAI कडे पाठवली जाईल.
4)दरम्यान मेन पेजवरील ‘लिंक आधार स्टेटस’ या लिंक वरून क्लिक करून नंतर स्टेटस तपासा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

CBDT announced last date for aadhar-pan link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button