ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Cabinet Decisions| तुमच्याशी संबंधित शिंदे फडणवीस सरकारचे महत्त्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा; जाणून घ्या सविस्तर

नुकतीच शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये वेतन आयोगा संदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. काय आहेत हे निर्णय, जाणून घेऊया सविस्तर.

  1. सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती (Natural calamity) म्हणून घोषित

या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली आहे. यानुसार सलग पाच दिवस पाऊस पडल्यास ती नैसर्गिक आपत्ती असणार आहे. तसेच यापूर्वी ज्या पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई मिळत नव्हती त्या पिकांनाही भरपाई मिळणार आहे.

  1. सातवा वेतन आयोग लागू होणार

अकृषी विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. संचालक, सहाय्यक संचालक व प्रकल्प अधिकारी यांना सहावा व सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. त्यासाठी 5 कोटी 90 लाख रुपये इतक्या खर्चाची अपेक्षा आहे.

  1. नवे रेती धोरण जाहीर

या बैठकीत नवे रेती धोरण जाहीर करण्यात आले. यानुसार नागरिकांना रेती आता स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा बसणार आहे.

  1. नागपूर मेट्रोच्या (Metro) दुसऱ्या टप्प्यास मंजुरी

नागपूर शहरातील मेट्रो रेल टप्पा दोन या प्रकल्पाच्या सुधारित मान्यतेस परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार नागपूरात 43.80 किलोमीटर अंतराची मार्गिका उभारण्यात येणार आहे.

वाचा: खुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

  1. नौदलाच्या सेलर इन्स्टिट्यूटसाठी भाडेपट्टीचे नूतनीकरण

मुंबईतील फोर्ट परिसरात भारतीय नौदलास दिलेल्या सेलर इन्स्टिट्यूट ‘सागर’ (SAGAR) या संस्थेत भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय मिळकतीचे नाममात्र दराने नूतनीकरण करण्यात आलं आहे. आगामी तीस वर्षांसाठी हा भाडेपट्टा राहणार आहे.

  1. देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प

मुंबईत गोवंडी येथे देवनार डम्पिंग ग्राउंड आहे. त्या ठिकाणी कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प होणार आहे. त्यासाठी जमिनीवरील आरक्षणात फेरबदल करण्यात आला आहे.

  1. महावितरणला कर्जासाठी शासनाची हमी मिळणार

थकीत देणी देण्यासाठी महावितरण कंपनीला कर्ज घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महावितरणला थकीत देणी देण्यासाठी 29 हजार 230 कोटी रुपयांची गरज आहे.

वाचा:  विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

  1. अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ

यानुसार अध्यापकीय पदांची युनिट निहाय पुनर्रचना करण्यात येणार आहे. यासाठी सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील 14 पदं नव्यानं निर्माण करण्यात येणार आहेत.

  1. परिस स्पर्श योजना

नँक व एनबीए मूल्यांकनासाठी आता महाविद्यालयांना मार्गदर्शनासाठी परिस स्पर्श योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेसाठी 13 कोटी 30 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button