ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

बिग ब्रेकिंग! आता भूमिहीनांना मिळणार जमीन; तब्बल 1 लाख 60 हजार जमिनीचे होणार वाटप, तुम्ही आहात का पात्र?

जमिनीचे वाटप

भूदान आंदोलना ला ६० वर्षे उलटली आहेत . यादरम्यान बिहारला १ लाख ६० हजार एकर दान करण्यात आलेली असून आता त्या भूमिहीनांना वाटप करण्यास योग्य असल्याचे बिहार सरकारला आढळून आले.

डिसेंबर नंतर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे –

महसूल अधिकाऱ्यांकडून प्रमाणित अशा १ लाख ६० हजार एकर जमिनीच्या वितरणाची प्रक्रिया डिसेंबरनंतर कधीही सुरू होऊ शकते, अशी माहिती बिहारच्या महसूल व भूसुधार विभागातील सूत्रांनी दिली आहे.

काही अडचणीमुळे प्रक्रिया थांबली होती

भूदान समितीने जेव्हा छाननी केली, तेव्हा अनेक जमिनींचे कागदोपत्री तपशील नसल्याचे आढळले. शिवाय यातील अनेक जमिनी नदीपात्रात, जंगलात किंवा डोंगरात असल्याचेही भूदान समितीला आढळून आले. या भूदान समितीने जेव्हा छाननी केली, अडचणींमुळे ही संपूर्ण प्रक्रिया प्रदीर्घ तेव्हा काळ रखडली.

आयोगाच्या अहवालीची वाट –

नोव्हेंबरमध्ये अहवाल भूदान चळवळीअंतर्गत सुमारे ६.४८ लाख एकर जमीन संपादित झाली होती. या जमिनीच्या व्यवस्थापन व वितरणातील अनियमिततेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने २०१७ मध्ये तीन सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने नोव्हेंबरमध्ये अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button