ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Bank Open on Sunday | बँका रविवारीही खुल्या राहणार! आरबीआयचा मोठा निर्णय

मुंबई: 31 मार्च 2024 रोजी रविवार (Bank Open on Sunday)असूनही सर्व बँका खुल्या राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने हा निर्णय घेतला आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 चा शेवटचा दिवस असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरबीआयने म्हटले आहे की, “आर्थिक वर्षाची वार्षिक समाप्ती 31 मार्च रोजी आहे. त्यामुळे सर्व बँका खुल्या राहतील. सर्व बँकांना पाठवलेल्या सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, आर्थिक वर्ष संपेपर्यंत होणारे व्यवहार याच वर्षी नोंदवले जावेत. रविवार(Bank Open on Sunday), 31 मार्च रोजी सर्व बँका त्यांच्या नियमित वेळेनुसार उघडतील आणि बंद होतील. शनिवारीही सर्व बँका सुरू राहणार आहेत.”

याशिवाय NEFT आणि RTGS व्यवहारही रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहतील. सरकारी धनादेश क्लिअर करण्यासाठीही विशेष तरतूद करण्यात येणार आहे. मात्र, शेअर बाजार बंद राहणार आहे.

वाचा | Crop Loan | मोठी बातमी ! केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! १० मिनिटात शेतकऱ्यांना मिळेल १.५ लाख रुपये कर्ज!

आयकर कार्यालयेही खुली राहणार

आयकर विभागानेही 29, 30 आणि 31 मार्च रोजी देशभरातील आयटी कार्यालये सुरू राहतील, असे म्हटले आहे. 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपणार असल्याने, रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे नागरिकांना काय फायदे मिळतील?

  • नागरिकांना आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसासाठी बँकिंग व्यवहार पूर्ण करण्याची सुविधा मिळेल.
  • NEFT आणि RTGS सारख्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करणे सोपे होईल.
  • सरकारी धनादेश लवकर क्लिअर होतील.
  • आयकर भरणे आणि इतर संबंधित कामे पूर्ण करणे शक्य होईल.

आरबीआय आणि आयकर विभागाच्या या निर्णयामुळे नागरिकांना आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसासाठी बँकिंग आणि कर संबंधित कामे पूर्ण करण्याची सुविधा मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button