ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Bank Rule | 1 जानेवारीपासून बँक लॉकरचे बदलणार नियम, ग्राहकांना मिळणार नुकसान भरपाई, जाणून घ्या सविस्तर…

Bank Rule | तुम्ही देखील बँक लॉकर वापरत असाल किंवा लॉकर भाड्याने घेण्याची योजना आखत असाल, तर तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या लॉकर नियमांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. खरं तर, 1 जानेवारी 2023 रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीसह, रिझर्व्ह बँक (Reserve Bank) लॉकर्सशी संबंधित नियम बदलणार आहे. हा नियम लागू झाल्यानंतर बँकांना (Bank Loan) लॉकरबाबत ग्राहकांशी मनमानी करता येणार नाही.

वाचा: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सरकारच्या ‘या’ भन्नाट योजना आहेत तुमच्या फायद्याच्या, जाणून त्वरित घ्या लाभ

लॉकरमध्ये ठेवलेल्या मालाचे खूप नुकसान झाले तर त्याची जबाबदारी आता बँकेची असणार आहे. याशिवाय आता ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत बँकेसोबत करार करावा लागेल. याद्वारे ग्राहकांना लॉकरच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाची माहिती एसएमएस आणि इतर माध्यमातून बँकेला द्यावी लागेल.

पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक; नागरिकांसह राज्यांना दिले कोरोनासंदर्भात ‘हे’ महत्वाचे निर्देश

नूतनीकरणासाठी करार करावा लागेल
1 जानेवारी 2023 पूर्वी, लॉकरधारकांना नवीन लॉकर करारासाठी पात्रता दर्शवावी लागेल आणि नूतनीकरणासाठी करार करावा लागेल. पंजाब नॅशनल बँक (PNB) सारख्या बँका देखील लॉकर कराराबद्दल ग्राहकांना सतर्क करण्यासाठी अलर्ट एसएमएस पाठवत आहेत. PNB कडून ग्राहकांना पाठवण्यात येत असलेल्या मेसेजमध्ये असे लिहिले आहे की, ‘RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन लॉकर करार 31 डिसेंबर 2022 पूर्वी अंमलात आणायचा आहे’.

वाचा: ब्रेकींग न्यूज! कोरोनाच्या नेझल लसीला भारतात परवानगी; आता इंजेक्शनची गरज नाही, वाचा सविस्तर

बँक देणार भरपाई
आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, बँकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमध्ये ठेवलेल्या साहित्याचे काही नुकसान झाल्यास, बँकेला त्याची भरपाई द्यावी लागेल. ज्या जागेत सेफ डिपॉझिट व्हॉल्ट्स ठेवल्या जातात त्या जागेच्या सुरक्षेसाठी सर्व पावले उचलणे ही बँकांची जबाबदारी आहे. बँकेच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या फसवणुकीमुळे नुकसान झाल्यास, बँकेचे दायित्व लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट पर्यंत असेल.

वाचा:बिग ब्रेकींग! चीन आणि अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक; केंद्र शासनाने राज्यांना सतर्कतेच्या जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना

‘या’ परिस्थितीत मिळणार नाही भरपाई
भूकंप, पूर, वीज, वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्ती, ग्राहकाच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास बँक जबाबदार राहणार नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button