ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अखेर ‘या’ जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना तब्बल 101 कोटींचा विमा मंजूर

Crop Insurance | यावर्षी अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आपल्या शेती (Agriculture) पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मोठा आर्थिक (Financial) भुर्दंड सोसावा लागला आहे. यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देखील देण्यात आली. तर दुसरीकडे विमा कंपन्यांकडे 72 तासाच्या आत क्लेम केल्यास प्रधानमंत्री पिक विमा (Crop Insurance) योजनेअंतर्गत विमा मिळतो. आता याच अंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल 101 कोटींचा विमा मंजूर करण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्याचा विमा मंजूर
अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील तब्बल 4 लाख 73 हजार 570 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे 72 तासाच्या आत नुकसानीची माहिती दिली होती. त्यानंतर नुकसान झालेल्या शेती (Department of Agriculture) पिकांच्या पंचनामा करण्यात आला. पंचनामे झाल्यानंतर नैसर्गिक आपत्ती घटनाअंतर्गत 97 कोटी 97 लाख आणि शेतकऱ्यांना काढणी पश्चात झालेल्या नुकसानीसाठी तीन कोटी रूपये असे एकूण 101 कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे.

वाचाऐकावं ते नवलचं! फक्त एका अननसाची किंमत ‘इतके’ लाख, जाणून घ्या कोणती आहे ही महागडी जात

किती झाले नुकसान?
नांदेड जिल्यातील जिरायतीमधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद, मूग या पाच लाख 27 हजार 141 हेक्टरवरील पिकांसह 314 हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले होते. तर 66 हेक्टरवरील फळपिके एकूण पाच लाख 27 हजार 491 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Web Title: Good news for farmers! Finally insurance of 101 crores has been approved for the loss victims of district

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button