ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Insurance | पिक विम्यासाठी शेतकऱ्यांनी शेगांव कृषी अधिकाऱ्यांना घेरलं; तत्काळ रक्कम वितरीत करा- प्रशांत डिक्कर

Crop Insurance | यावर्षी सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पुर्ण पिके पाण्याखाली गेली होती. तरी सुद्धा पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत भरीव रक्कम न देता कंपनीने शेतकऱ्यांच्या (Department of Agriculture) बँक खात्यावर तुटपुंजी रक्कम जमा केल्याने स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या सह शेकडो शेतकऱ्यांनी (Agriculture) दि.9 डिसेंबर रोजी तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकारी यांना घेराव घालून यांच्यावर पिक विमा (Crop Insurance) प्रश्नाबाबत समस्येचा पाढा वाचत प्रचंड रोष व्यक्त केला.

शेतकऱ्यांना 100 टक्के रक्कम मिळावी
यावर्षी अतीवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊनही विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना तोडकी भरपाई देउन कंपनीने चेष्टा चालु केली आहे. याचाच आक्रोश करीत शेतकऱ्यांनी शेगांव कृषी कार्यालया समोर प्रचंड घोषणाबाजी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकऱ्यांना 100% पिक विमा मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

वाचाऐकावं ते नवलचं! फक्त एका अननसाची किंमत ‘इतके’ लाख, जाणून घ्या कोणती आहे ही महागडी जात

…अन्यथा करणार आंदोलन
शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून कृषी कार्यालयासमोर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी प्रशांत डिक्कर यांनी बोलताना सांगितले जिल्ह्यातील 46 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत एक छदामही सुद्धा विमा कंपनीने दिला नाही. तसेच AIC कंपनीची चौकशी करून कारवाई करावी व शेतकऱ्यांना 100% पिक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा सरकार व विमा कंपनीच्या विरोधात जणआंदोलन उभारणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

ज्या शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली नाही, व ज्या शेतकऱ्यांना पिकाच्या झालेल्या नुकसान तुलनेत कमी रक्कम मिळाली अशा हजारो शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे तक्रारी देण्यात आल्या. तक्रारीचा तत्काळ निपटारा करुन विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आंदोलनात शेगांव शहर अध्यक्ष गोपाल तायडे, संतोष खेर्डे, राजेश उमाळे, दत्ता डिक्कर, अमोल वगारे, रोशन देशमुख सह संघटनेचे शेकडो का कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

संतोष देठे पाटील बुलढाणा

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers lobbied agriculture officials for crop insurance; Disburse the amount immediately – Prashant Dikkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button