ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान
ट्रेंडिंग

शेती व तंत्रज्ञान: शेतीसाठी आले आहे, “फोर इन वन यंत्र” पहा काय आहेत याची वैशिष्ट्ये..!

Agriculture and Technology: Comes for Agriculture, "Four in One Machine," see what are the features ..!

शेती करताना पिकांना लागणारा खर्च कमी होण्यासाठी कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रे काम करत असतात. याप्रमाणे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ (vasantrao Naik Marathwada krishi Vidyapeeth) आणि हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन केंद्र (Central Drought Research Center, Haydrabad) यांनी संशोधन करून सुधारित रुंद वरंबा सरी यंत्र बनविले आहे.

हे यंत्र सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी फायदेशीर ठरेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. माहिती कृषी यंत्र शक्ती विभाग प्रमुख डॉ.स्मिता सोलंकी यांनी सांगितले हे यंत्र लवकरच विविध ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. रुंद वरंबा सरी (BBF) हे विकसित केलेले यंत्र प्रामुख्याने कोरडवाहू क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठरणार आहे. या यंत्रामध्ये प्रमुख्याने बदल चार फणी ऐवजी पाच फणी चे यंत्र विकसित केले आहे.

या यंत्राचा उपयोग बियाणे, खते ,पेरणी, रासनी फवारणी तसेच कोळपणी ही कामे करण्यासाठी होणार आहे. ट्रॅक्‍टरच्या (Tractor) साह्याने हे यंत्र वापरता येणार आहे. कमी रुंदीचे टायर लावून तीन टप्प्यात सोयाबीन व इतर पिकांमध्ये पेरणी ते फवारणी तसेच कोळपणी पर्यंत कामे करतात.

[metaslider id=4085 cssclass=””]

या यंत्राच्या निर्मितीसाठीपुणे येथील रोहित इंडस्ट्रीज (Rohit Industries in Pune) शी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या यंत्राद्वारे प्रात्यक्षिक घेण्यात आली. जवळजवळ 150 हेक्‍टर क्षेत्रावर यांत या यंत्राद्वारे सोयाबीन पेरणी सह इतर कामांची चाचण्या घेण्यात आल्या. या सुधारित तंत्रज्ञानामुळे बियाणे बियाणांची आणि खतांची पंधरा ते वीस टक्के बचत होते म्हणजेच उत्पादन खर्चात बचत (Savings in production costs) होणार आहे. त्यामुळे नक्कीच या सुधारित यंत्रामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

हे ही वाचा….

महाबीज बियाणे मिळेल पण, एका अटीवर कृषी सेवा संचालकांची मनमानी कारभार वाचा सविस्तर बातमी…

पशुखाद्य’ दर कडाडले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र कोलमडले! वाचा सविस्तरपणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button