ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Agricultural Irrigation | शेतकऱ्यांची पिके बहरणार जोमात ! राष्ट्रीय कृषि सिंचन विकास योजनेसाठी तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या निधी वितरणास मान्यता

Agricultural Irrigation | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत सन २०१५-१६ पासून प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या दि.६ एप्रिल २०२२ रोजीच्या पत्रान्वये राष्ट्रीय कृषि विकास योजना-रफ्तार वी राष्ट्रीय कृषि विकास योजना- कॅफेटेरिया या नावाने पुनर्ररचना करण्यात आली आहे. त्यामध्ये वार्षिक कृती आराखडा आधारित व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या दोन शाखांचा समावेश आहे. आता याच कृषी सिंचन (Agricultural Irrigation) योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा : Irrigation Scheme | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! तुषार आणि ठिबक सिंचनासाठी मिळतंय तब्बल 80 टक्के अनुदान, जाणून घ्या सरकारची योजना…

Pradhan Mantri Agriculture Irrigation Scheme | प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतील प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) हा घटक राष्ट्रीय कृषि विकास योजना- कॅफेटेरियाच्या वार्षिक कृती आराखडा आधारित शाखेत अंतर्भूत केली असून केंद्र व राज्य हिश्श्याच्या निधीचे प्रमाण ६०:४० असे आहे. आता राष्ट्रीय कृषि विकास योजना कॅफेटेरिया योजनेंतर्गत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्य स्तरीय मंजुरी समितीकडून कोट्यवधींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

Approval of crores of funds for National Agricultural Development Scheme | राष्ट्रीय कृषि विकास योजनेसाठी कोट्यवधींच्या निधीस मान्यता
सन २०२३-२४ मध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी रु. ५०९.९८ कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजना कॅफेटेरिया च्या प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) घटकाअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र हिश्श्याचा रु.४८.२९ कोटी रुपये व त्या समरुप राज्य हिश्श्याचा रु.३२.१९ कोटी रुपये बत्तीस कोटी एकोणिस लाख फक्त असा एकूण रु. ८०.४८ कोटी रुपये निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button