ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Post Office | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 6 योजनांमध्ये पैसे होणार दुप्पट, जाणून घ्या योजना आणि किती दिवसांत मिळेल जबरदस्त परतावा

Post Office | पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम्सद्वारे अशा अनेक योजना चालवल्या जातात, ज्याद्वारे तुम्ही काही वर्षांत तुमचे पैसे सहज दुप्पट करू शकता. जर तुम्हीही पैसे दुप्पट करण्याची योजना (Lifestyle) शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुमचे पैसे (Money) लवकरच दुप्पट होतील. या योजनांमध्ये तुमचे पैसे दुप्पट करण्यासाठी तुम्हाला किती वर्षे लागतील ते जाणून घेऊयात.

या योजनांमध्ये पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट, पोस्ट ऑफिस (Post Office Yojana) बचत खाते, पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना, पोस्ट ऑफिस सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Financial) पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खाते (Lifestyle) आणि पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट यांचा समावेश आहे.

वाचा: ई-पीक पाहणी केली तरचं मिळणार पीक विमा! त्वरित जाणून घ्या सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद कशी करायची?

Post Office Time Deposit | पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट
पैसे दुप्पट करण्यासाठी, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ही सर्वोत्तम योजना आहे. यामध्ये 1 ते 3 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 5.8 टक्के व्याज मिळते. यामध्ये गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे सुमारे 13 वर्षांत दुप्पट होतील.

Post Office Monthly Income Scheme | पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेतील पैसे सुमारे 10.91 वर्षांत दुप्पट होतात. यामध्ये तुम्हाला 6.7 टक्के दराने व्याजाचा (Interest) लाभ मिळतो.

सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट! पीएम किसानचे 2 हजार ‘या’ तारखेपासून होणार जमा; कृषी मंत्रालयाने दिली माहिती

Post Office Senior Citizens Savings Scheme | पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना
पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक (Lifestyle) बचत योजनेतील 4 पैसे सुमारे 9.73 वर्षांत दुप्पट होतील. यामध्ये 7.6 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळणार आहे.

Post Office Savings Account | पोस्ट ऑफिस बचत खाते
बचत खात्यातील पैसे दुप्पट करण्यासाठी सुमारे 18 वर्षे लागतील. या योजनेला सर्वाधिक वेळ लागतो कारण त्यात व्याजदरही कमी असतो. सध्या यामध्ये ग्राहकांना 4 टक्के दराने व्याज मिळत आहे.

Post Office Recurring Deposit | पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट सुमारे 12.41 वर्षांमध्ये दुप्पट होईल. यामध्ये तुम्हाला 5.8 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळतो.

वाचा: अर्रर्र…! आता ‘हे’ बँकधारक सापडणार आरबीआयच्या कचाट्यात; बँकेने दिली मोठी माहिती

Post Office National Savings Certificate | पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट
पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर
6.8 टक्के व्याज मिळत आहे. या 5 वर्षांच्या बचत योजनेत गुंतवणूक केल्यास सुमारे 10.59 वर्षांमध्ये पैसे दुप्पट होतील.

बऱ्याच काळानंतर केंद्र सरकारने काही लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. या अल्पबचत योजनांच्या व्याजदरात झालेली वाढ 1 ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. तुम्ही गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिस बचत योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Post Office 6 schemes will double your money, know the scheme and in how many days you will get tremendous returns

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button