ताज्या बातम्या

Lok Sabha Elections |लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का का बसला? फडणवीस ची प्रतिक्रिया..

Lok Sabha Elections | नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. 400 पेक्षा जास्त जागा मिळवण्याचा दावा करणाऱ्या भाजपला केवळ 240 जागांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, एनडीएला एकूण 291 जागांवर विजय मिळाल्याने बहुमत मिळाले आहे.

दुसरीकडे, इंडिया आघाडीने 234 जागांवर आघाडी मिळवली आहे, ज्यात एकट्या काँग्रेसला 99 जागांवर यश मिळाले आहे. महाराष्ट्रात भाजपची कामगिरी आणखी खराब ठरली आहे. राज्यात भाजपला फक्त 10 जागांवर आघाडी मिळाली आहे, तर महायुतीला राज्यात फक्त 17 जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 30 जागांवर विजय मिळवला आहे. सांगलीमध्ये काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत.

भाजपच्या या पराभवावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील हा पराभव विधानसभा निवडणुकीत व्याजासह भरून काढू.”

फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत दिले आहे आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. देशातील जनतेने मोदीजींना भक्कम साथ दिली आहे.” वाचा :Rate Hike | कांद्याच्या दरात वाढ! निवडणुकीनंतर निर्यातबंदीमुळे भाव सुधारले

फडणवीस यांनी पुढे म्हटले की, “संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे दुर्दैव आहे. पण, जनतेचा जनादेश शिरसावंद्य मानून विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू.”

महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत आणि ते पुढेही घेत राहतील, असेही फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button