ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

तुमच्या जमिनीचे शासकीय बाजार मूल्य किती आहे? पहा घरी बसून ऑनलाईन पद्धतीने…

शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीचे शासकीय बाजार मूल्य किती आहे हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. आपल्या जमिनीचा शासकीय बाजार मूल्य किती आहे? ऑनलाईन पद्धतीने कसा पाहायचा? व या जमिनीचं मूल्यांकन कशाप्रकारे ठरवले जाते? याविषयी सविस्तर माहिती पाहूया…

वाचा: गूळ प्रकल्पासाठी आता सरकारकडून ५० टक्के अनुदान; “या” जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात…

जमिनीचे शासकीय बाजार मूल्य ऑनलाईन पद्धतीने असे पहा –

1) सर्वप्रथम igrmaharashtra.gov.in या वेबसाईट व जा.
या वेबसाईटवर वरती गेल्यावर लेफ्ट साईटला एक ऑप्शन दिसेल मूल्यांकन दर.

2) मूल्यांकन दर वर क्लीक केल्यावर महाराष्ट्रातील जे मूल्यांकन दर आहेत, जमिनीचे दर कसे निश्चित केले जातात हे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता.

3) हेच दर पुन्हा ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी मेन पेज वरती या.

4) यावरती महत्वाचे दुवे च्या अंतर्गत मिळकत मूल्यांकन नावाचे एक ऑप्शन असेल या ऑप्शन वर क्लीक करा.

5) पुढे दुसऱ्या वेबसाईट वर जाल तिथे महाराष्ट्राचा नकाशा दाखवलेला असेल. ही वेबसाईट नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्रची आहे बाजार मूल्य दर पत्रक ची.

6) यामध्ये ज्या जिल्ह्याचे दर पत्रक, बाजार मूल्य पहायचे आहे. त्या जिल्ह्यावरती क्लीक करून तुम्ही त्या जिल्ह्याचा बाजार मूल्य पाहू शकता.

7) जिल्हा निवडा, पुढे वर्ष निवडा, पुढे तालुका निवडा, तालुका निवडल्या नंतर पुढे गावांची यादी दिसेल गाव सिलेक्ट करा. पुढे बाजार मूल्य आकारणी नुसार दाखवलेले असेल. तुमच्या जमिनीला सातबाऱ्यावरती आकारणी दिलेली असेल त्यानुसार बाजार मूल्य दर दाखवले जातील. त्यामुळे गावातील प्रत्येक सर्वे नंबर ला आकारणी वेगवेगळी असेल तर दर बदलले जातात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button