ताज्या बातम्या

One farmer one DP scheme| काय आहे एक शेतकरी एक डीपी स्कीम ? याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल नक्कीच वाचा..

आपल्या राज्यात शेतकरी अडचणीत आले आहेत असे दिसत आहे. महावितरण आणि शेतकरी यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे.अनेक ठिकाणी सध्या शेतकऱ्यांची वीज तोडली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जाऊ लागते आहे. आता सरकारकडून एक शेतकरी एक डीपी 2022 ही योजना आणली गेली आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Scheme|काय आहेस स्कीम –

शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी उच्च दाबाची वीज शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज, लाईट जाणे, तारांवर प्रकाश टाकणे, लाईट, वीज कट, जीवघेणा धोक्यात येऊ नये या सर्व बाबींचा विचार करून एचव्हीडीएसला उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या योजनेचा ९० हजार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. यासाठी ११३४७ कोटींच्या या योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. महावितरण कंपनीला आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन २२४८ कोटी रुपयांचा आर्थिक निधी वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये ही सर्व कामे करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना गंभीर समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये विद्युत पुरवठा मध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीज हानी वाढणे, रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ, विद्युत अपघात अशा घटनांचा समावेश आहे.

Information|उच्च दाब वितरण प्रणाली –

त्यामुळे उच्च दाब वितरण प्रणाली मुळे अखंडित व शाश्वत वीजपुरवठा होण्यासह विद्युत हानी अपघात व रोहित्र बिघाड या तिन्ही बाबींमध्ये घट होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति HP ७,००० रुपये द्यावे लागतील. अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना व ५,००० रुपये द्यावे लागतील.

Documents |उच्च दाब प्रणाली ला लागणारे कागदपत्रे :

याचा पुरेपूर फायदा घेता येणार आहे पण त्यासाठी त्यांना काही कागदपत्रे जमा करायला लागतील. यासाठी आधार कार्ड, मोबाइल नंबर, शेताचे ७/१२ प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button