ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update | थंडीच्या आगमनाची चाहूल! किमान तापमान घसले, गारठ्याची तयारी करा!

Weather Update | Waiting for the arrival of winter! Minimum temperature drops, prepare for hail!

Weather Update | पावसाच्या निरोपानंतर महाराष्ट्रात थंडीचे हल्ले वाढले आहेत. राज्यातील बहुतांश भागात किमान तापमान घसरत असून, अनेक ठिकाणी ते १८ अंशांच्या खाली आले आहे. (Weather Update) हवामान तज्ज्ञांच्या मते, आज (ता. १४) तापमानात आणखी २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत गारठ्याचा कडाका वाढणार आहे.

कोकण पट्टा वगळता राज्याच्या इतर विभागात थंडीची झळ बसली आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात रविवारी सकाळी किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, हे राज्यातील सर्वात तपमान आहे. अमरावती, नाशिक, जळगाव, धुळे, सोलापूर, आणि औरंगाबाद यासह अनेक शहरांमध्ये किमान तापमान १५ ते १७ अंशांच्या दरम्यान आहे.

वाचा : Nari Shakti Dut App | सरकारी योजनांचा लाभ तुमच्या हातात! नारी शक्ती दूत अ‍ॅप लाँच… पहा सविस्तर माहिती..

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातही थंडीचा कहर आहे. शनिवारी (ता. १३) हरियाणाच्या नर्नूल, दिल्लीच्या अयानगर आणि उत्तर प्रदेशातील कानपूर येथे देशातील सपाट भूभागावरील सर्वात कमी उणे ३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. यामुळे या भागातील जनजीवनावर थंडीचा मोठा परिणाम होत आहे.

पुण्यातही थंडीचे वारे वाढले आहेत. आज सकाळी ८ वाजता शहरातील तापमान १७.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दुपारी तापमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असली तरी, रात्री ते पुन्हा घसरून १४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

Web Title | Weather Update | Waiting for the arrival of winter! Minimum temperature drops, prepare for hail!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button