lang="en-US"> Electric Scooty| इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार सुरू आहे का

Electric Scooty| इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार सुरू आहे का ? हे पर्याय ठरू शकतात तुमच्यासाठी स्वस्तात मस्त !

Electric Scooty|दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. अशातच गाडीसाठी लागणाऱ्या पेट्रोल व डिझेलचा खर्च सुद्धा वाढत आहे. कारण पेट्रोल व डिझेलचे दर सारखेच भडकत असतात. यामुळे लोकांनी इलेक्ट्रिक गाड्यांना (Electric vehicles) प्राधान्य देणे सुरू केले आहे. बाजारात विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या उपलब्ध आहेत. दरम्यान सध्या विडाच्या (Vida) स्कूटर व्ही १ प्रो आणि व्ही १ प्लस या गाड्यांची चर्चा सुरु आहे.

विडा कंपनीने स्कूटरच्या किंमतीत केली कपात

हिरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp) सब ब्रँड विडा अंतर्गत नवीन इलेक्ट्रिक गाड्या लाँच केल्या आहेत. यामध्ये स्कूटर व्ही १ प्रो आणि व्ही १ प्लसचा समावेश आहे. या कंपनीने आपल्या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. व्ही १ प्लस स्कूटरची किंमत आता १ लाख १९ हजार ९०० रुपये (एक्स शोरूम) आणि विडा व्ही १ प्रो ची (एक्स शोरूम) किंमत १ लाख ३९ हजार ९०० रुपये इतकी आहे.

वाचा: रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! आता धान्याऐवजी खात्यात जमा होणार पैसे; त्वरित करा ‘असा’ अर्ज

म्हणून किंमत केली कमी

यामध्ये पोर्टेबल चार्जर (Poratble Charger) आणि फेम २ सबसिडीची सुद्धा किंमत जोडलेली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या गाड्यांची किंमत कमी करण्यात आली आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये सबसिडीच्या आधारावर इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत वेगवेगळी असणार आहे.

स्कूटर्सची वैशिष्ट्ये

१) दोन्ही स्कूटर्सची डिझाइन एक सारखी आहे.
२) दोन्हीसोबत ईव्ही रिमूव्हल बॅटरी मिळते.
३) व्ही १ प्लसची बॅटरी क्षमता ३.४४ केडब्ल्यूएच आणि व्ही १ प्रो ची बॅटरी क्षमता ३.९४ केडब्लयूएच आहे.
४) विडा व्ही १ प्रोची रायडिंग रेंज १६५ किमीची आहे. तर व्ही १ प्लसची रेंज १४३ किमीची आहे.
५) मोटर आणि टॉप स्पीडदोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर ६ केडब्ल्यू मोटर सोबत येतात.
६) दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप स्पीड ८० किमी प्रति तास आहे.

कंपनीने उभारले ३०० चार्जिंग पॉईंट्स

विडा या कंपनीचा देशभरात विस्तार करण्यासाठी कंपनीने आता काही ठोस पाऊले उचलली आहेत. देशातील १०० शहरांमध्ये सेवा देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीने सार्वजनिक वापरासाठी काही शहरांमध्ये ५० ठिकाणी जवळपास ३०० चार्जिंग पॉइंट्स उभारले आहेत .अशी माहिती विडा कंपनीने दिली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Vida announced modified prizes of electric bikes to attract customers

Exit mobile version