राशिभविष्य

Vat Purnima 2024 : यंदा वट पौर्णिमेला पूजेसाठी दोनच शुभ मुहूर्त; साहित्य, पूजाविधी जाणून घ्या

Vat Purnima 2024 : ज्येष्ठ महिन्याची सुरुवात होताच विवाहितांसाठी वेध लागतात आणि वटपौर्णिमेचा सण येतो. वटपौर्णिमेपासूनच सणांना सुरुवात होते. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

पण यंदा महिलांसाठी थोडी घाई होणार आहे. कारण वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त खूप कमी आहेत.

वटपौर्णिमा कधी आहे?

  • हिंदू पंचांगानुसार वटपौर्णिमा तिथी 21 जूनला संध्याकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि 22 जूनला सकाळी 6 वाजून 38 मिनिटांपर्यंत असणार आहे.
  • उदय तिथीनुसार 21 जूनला वटपौर्णिमा सण साजरा केला जाईल.

वाचा :Skin care: नाकावर पांढरे दाणे दिसतात? किचनमधल्या 3 वस्तू नाकावर 5 मिनिटं लावा, व्हाईडहेड्स होतील दूर

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी?

  • महिलांनो लक्ष द्या! यंदा वडाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त कमी आहेत. त्यामुळे घरातील कामे आधीच उरकून घ्या.
  • 21 जूनला पहाटे 5.24 मिनिटांपासून सकाळी 10.30 मिनिटांपर्यंत पहिला शुभ मुहूर्त आहे.
  • दुपारी 12.23 वाजेपासून 2.27 मिनिटांपर्यंत दुसरा शुभ मुहूर्त आहे.

वटपौर्णिमेची पूजा कशी करावी?

  • वटपौर्णिमेची पूजा विधीवत कशी करावी ते जाणून घेऊया.
  • यासाठी बाजारात मिळणाऱ्या वटपौर्णिमेच्या प्रतिमा आणा आणि त्यांची पूजा करा.
  • ब्रह्म सावित्री देवतेचं ध्यान करून 16 उपचारांनी पूजा संपन्न करा.
  • सुपारीच्या गणपतीची स्थापना करा आणि हळद, कुंकू, अक्षता वाहून पंचामृत स्नान विधी करा.
  • सौभाग्य अलंकार देवीला म्हणजे वडाला अर्पण करा. यामुळे पतीचं आयुष्य वाढतं.
  • नंतर वट वृक्षाला तीन प्रदक्षिणा घालून दोर बांधा.
  • फळं आणि नारळ अर्पण करा.
  • मुंबई आणि कोकण परिसरात फणस, आंबा, जांभूळ, कंरवंद आणि केळी या फळांना महत्त्व आहे.
  • तुमच्या परिसरात मिळणारी 5 फळं तुम्ही अर्पण करू शकता.
  • नंतर पाच सुवासिनींची पाच फळं आणि गव्हाने ओटी भरा.
  • मुंबई आणि कोकण परिसरात पाच किंवा सात काळे मणी एका धाग्यात ओवून मंगळसूत्राला बांधण्याची परंपरा आहे.
  • या दिवशी उपवास करणं महत्वाचं आहे. हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी 10 नंतर सोडावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button