lang="en-US"> महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार वादळी पावसाचा इशारा - मी E-शेतकरी

Weather Update | शेतकऱ्यांनो गहू-बाजरी काढली का? महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार वादळी पावसाचा इशारा, लगेच जाणून घ्या…

Weather Update | उन्हाळ्याच्या तीव्रतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (Weather Update) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. सोलापूरमध्ये यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४३.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर चंद्रपूर, वर्धा, ब्रह्मपुरी आणि यवतमाळ येथे तापमान ४२ अंशांचा पार आहे.

विदर्भात उष्ण लाटेचा इशारा:
आज (७ एप्रिल) विदर्भातील अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.

Wheat Rate | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात गव्हाचे दर विक्रमी उच्चांकावर, जाणून घ्या किती मिळतोय दर?

वादळी पावसाचा इशारा:
आज (७ एप्रिल) नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

गारपीटीची शक्यता:
उद्यापासून (८ एप्रिल) विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीतीची शक्यता आहे.

हवामान विभागाचे आवाहन:
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि वादळी पावसाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा:

Exit mobile version