lang="en-US"> यंदाच्या वर्षी वरूनराजाची कृपादृष्टी होणार ! 'या' चारही महिन्यात पडणार पाऊस

Mansoon Rain | यंदाच्या वर्षी वरूनराजाची कृपादृष्टी होणार ! ‘या’ चारही महिन्यात पडणार पाऊस…

शेती व्यवसाय हा संपूर्णतः पाण्यावर अवलंबून असतो. त्यामुळे शेतीसाठी पाऊस (Rain) हा खूप महत्त्वाचा घटक आहे. परंतु आजकाल निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस अवेळी येतो. यामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. मागच्या दोन वर्षात कोरोना व नैसर्गिक संकटे यामुळे शेतीचे भरपूर नुकसान झाले. पण यंदाच्या वर्षी शेतीला ‘अच्छे दिन’ येतील अशी चिन्हे दिसत आहेत , कारण एका ऑस्ट्रेलियन हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षी पाऊसमान चांगले राहणार आहे.

असे असेल यंदाचे पाऊसमान

यावर्षी जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही पावसाळी महिन्यात चांगाला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यंदा पावसाळ्याला चांगल्या मान्सूनपूर्व पावसाची (Mansoon Rain )साथ मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. यावर भारतीय हवामान खात्याने अजून कोणताही अंदाज वर्तवला नसून एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात याबाबतीत घोषणा होईल.

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

मागच्या दोन वर्षापासूम शेतकऱ्यांना कोरोना व नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले आहे. जर यंदाच्या वर्षी पाऊसाची कृपादृष्टी राहिली तर मात्र त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मोठा फायदा होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Exit mobile version