ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

काळजी गरज म्हणा किंवा शेतकऱ्यांना मोठे होण्याची संधी , व्हर्टिकल फार्मिंग आहे एक उत्तम पर्याय ! जाणून घ्या खाली याची सविस्तर माहिती…

वर्टीकल फार्मिंग ( Vertical Farming)म्हणजे नेमकं काय : आज वेगवेगळ्या रासायनिक वस्तूंचा जमिनीसाठी वापर केला जातो व त्यामुळे जमिनीची कस कमी होत चालली आहे. शेतकऱ्यासाठी जमीन कार्यक्षम ठरत नाही त्याला कार्यक्षम बनवायला लागते व त्याला परत शेतकऱ्याला भरमसाठ खर्च करावा लागतो. तर शेतकऱ्यांना जमीन न वापरता उत्पन्न करता येईल का? उपाय म्हणून आज वर्टीकल फार्मिंग ही शेती केले जात आहे.पारंपरिक शेतीच्या तुलनेत या शेतीमध्ये तब्बल ८ आठवड्यात पीक तयार होते. शेतकऱ्याला या शेतीमध्ये जमीन हवामान याची काळजी घ्यावी लागत नाही. तसेच कीटकनाशकांच्या सुद्धा वापर होत नाही. उत्तर वर्टीकल फार्मिंग म्हणजे नक्की काय प्रकार? ही एक अश प्रकारचा शेती आहे, ज्यामध्ये फळ व भाजीपाला उत्पादने एका थरच्या वर इतर थर ठेवून बनविली जातात.

व्हर्टिकल फार्मिंग कशी करावी :

कमी जमिनीवरती ही शेती करता येते. व्हर्टिकल फार्मिंग ची लागवड हायड्रोपोनिक्स ,एरोपोनिक व एक्वापोनिक अशा तीन प्रकारे करता येते. हायड्रोपोनिक शेती मध्ये मातीचा वापर केला जात नाही रोपट्यांची मुळे पोषकतत्व मध्ये बुडवलेली असतात व उत्पादन पाण्यावरती केल्या जाते. अर्थातच माती विरहित शेती म्हणजेच हायड्रोपोनिक्स. एक्वापॉनिक सिस्टममध्ये वनस्पती आणि मासे एकाच इकोसिस्टममध्ये तयार केले जातात. तर, एरोपॉनिक सिस्टममध्ये माती किंवा कोणतेही द्रव आवश्यक नाही. एअर चेंबरमध्ये आवश्यक पोषक द्रव्यांच्या मदतीने मिसळले जातात. त्यातील पाण्याचे सेवन जवळपास नसल्यातच जमा असते. या शेतीमध्ये पाण्याचा पुरेपूर वापर केला जातो व पारंपरिक शेतीच्या तुलनेत ८०% टक्के पाण्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो.

व्हर्टिकल फार्मिंग चे फायदे :

• हवामानाची काळजी न करता चांगले उत्पादन भेटते.
• कीटकनाशक व तणनाशक यांचा वापर केला जात नाही.
• वीज , पाणी व माती सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही.
• पारंपरिक शेतीच्या तुलनेत जास्त उत्पादन मिळते.
व्हर्टिकल फार्मिंग या शेती साठी सरकार अनुदान सुद्धा देत आहे. व्हर्टिकल फार्मिंग ही शेती पद्धती नक्कीच शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्यास सामर्थ्य ठेवते.

ऋतुजा ल निकम ( MBA AGRI)

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button