ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

“या” जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार; राज्य शासनाने केली रक्कम जाहीर..

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्वाधिक मदत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. बीड जिल्ह्याला सर्वाधिक ६३४ कोटींची मदत मिळणार आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

राज्यशासनाचे 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर –

मराठवाड्यात ४७ लाख शेतकऱ्यांचे ३६ लाख ६२ हजार ७८२ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईसाठी २५८५ कोटी रुपयांची गरज एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे असतानाच बुधवारी राज्य शासनाने जाहीर केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेजमधून विभागाला सुमारे ३७०० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. ९७५ कोटी रुपये एनडीआरएफच्या निकषांच्या तुलनेत जास्तीचे मिळणार असून बीड जिल्ह्याला सर्वाधिक ६३४ कोटींची मदत मिळणार आहे.

मराठवाडयातील शेतकऱ्यांना ही चांगली मदत –

मराठवाड्यात ७ सप्टेंबर ते ७ आॅक्टोबरदरम्यान गुलाब वादळाच्या परिणामांसह झालेल्या अतिवृष्टीमुळे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले क्षेत्र वाढले आहे. राज्यशासनाने १० हजार कोटींचे पॅकेज तातडीची मदत म्हणून जाहीर केले असले तरी यात मराठवाड्यातील नुकसान पाहता ३७०० हजार कोटी त्यातून मिळणे शक्य आहे.

जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी १० हजार
बागायतीसाठी १५ हजार तर फळपिकांसाठी २५ हजार हेक्टरी मदत राज्यशासन देणार आहे.

वाचा –

या जिल्ह्यांसाठी एवढी मदत –

औरंगाबाद जिल्ह्यात ५५५ कोटी रुपये, जालना जिल्ह्यात जिरायती क्षेत्रासाठी ४७७ कोटी, परभणीत ३३८ कोटी, हिंगोलीत २९४ कोटी, नांदेड ५५१ कोटी, लातूर ४३४ कोटी, उस्मानाबाद ३०५ कोटींची मदत मिळणार आहे. यात विभागातील १०२ कोटी बागायत आणि १२५ कोटी फळबागांच्या नुकसानीसाठी असणार आहे.

क्षेत्रनिहाय नुकसान –

जिरायती क्षेत्र : ३५ लाख ३४ हजार हेक्टरसाठी अंदाजे ३५३० कोटी

बागायत क्षेत्र : ६८ हजार ३९१ हेक्टरसाठी सुमारे १०२ कोटी

फळपिकांचे क्षेत्र : ५० हजार १०९ हेक्टर सुमारे १२५ कोटी
एकूण क्षेत्र : ३६ लाख ५२ हजार हेक्टरसाठी ३७०० कोटी

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button