ताज्या बातम्या

त्या निवडणूकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरसावले सरकार ! होळीच्या सणाला मोफत सिलिंडर आणि रेशन होणार वाटप ….

नुकत्याच देशातील चार महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणूका पार पडल्या. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश (UP) सरकारने निवडणूकीच्या काळात ठराव पत्रात सांगितल्या प्रमाणे मोफत गॅस सिलिंडर (Free gas cylinder) देण्याची तयारी सुरू केली आहे.

होळीच्या दिवशी होणार गॅस सिलिंडर वाटप

यूपी सरकार उज्ज्वला योजने (Ujjvala Yojna) अंतर्गत मोफत सिलिंडर वाटप करणार आहे. यासाठी होळीच्या दिवशीच गॅस सिलिंडर देण्याचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने सरकारकडे पाठवला आहे.
राज्यात या योजनेचे १.६५ कोटी लाभार्थी असून सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर वित्त विभागाकडून अंदाजपत्रक जारी करून जिल्ह्यांमध्ये सिलिंडर दिले जातील. या योजनेचा यूपी राज्यातील नागरिकांना लाभ होणार असून ऐन होळीत मोफत सिलिंडर वाटप होणार असल्याने लाभार्थी आनंदात आहेत.

‘ही’ आहे आणखी एक आनंदाची बातमी !

निवडणूक प्रचारा दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोफत सिलिंडर सोबतच मोफत रेशन देण्याची सुद्धा घोषणा केली होती. यामुळे सरकारकडून मोफत हरभरा, मीठ, तेल, गहू आणि तांदूळ देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. एकंदरीतच आता युपी सरकार निवडणूकी दरम्याम दिलेली आश्वासने लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरसावले असल्याचे दिसून येत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button