ताज्या बातम्या
ट्रेंडिंग

Linking Ration To Aadhar Card | सरकारने रेशन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची वाढवली तारीख, ‘या’ तारखेपर्यंत करू शकता लिंक

सरकारने २०१९ साली ‘वन नेशन वन रेशन कार्ड' (One Nation-One Ration card) ही योजना आंमलात आणली होती. ही योजना आंमलात आणण्याचं कारण म्हणजे संपूर्ण देशात एकच रेशन कार्ड नियमित करावे हे आहे.

Linking Ration To Aadhar Card | तर देशातील जवळपास ९६% धारकांनी या योजनेत फेब्रुवारी २०२२ पर्यंत आपले नाव नोंदवले. तर आता सरकारने या योजनेची अंतिम मुदत आणखी वाढवली आहे.

आधार कार्ड रेशन कार्डला लिंक करणे आवश्यक

आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आपला आधार कार्ड नंबर रेशन कार्डला लिंक (Ration Card Aadhaar Card Link) करणे गरजेचे आहे. जेव्हा आधार कार्ड रेशन कार्ड लिंक करण्यात येईल त्याचवेळी ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेत धारकाचा समावेश होईल.

वाचा: Electric Scooter launched | भारतात लॉन्च झालेली इलेक्ट्रिक स्कूटर ! Okinawa Okhi 90 याची बॅटरी आहे जबरदस्त…

आधार कार्डला रेशन कार्ड लिंक केल्यामुळे काय होईल फायदा ?

  • आधार कार्डला (Aadhaar Card) रेशन कार्ड (Ration Card) लिंक केल्यामुळे देशातील भ्रष्टाचार आणि अनियमितता हळू हळू संपुष्टात येतील.
  • धारक कामानिमित्त कोणत्याही राज्यात किंवा प्रदेशात राहत असेल, तर त्याला या ऑनलाईन माध्यमातून कुठेही असला तरी रेशन कार्डचा लाभ घेता येईल.

आधार कार्ड रेशन कार्डला लिंक करण्यासाठी सरकारने केली मुदत वाढ

कित्येक राज्यांमध्ये धारकांनी या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचमुळे या योजनेचे काम अद्याप अपूर्ण आहे. याच कारणामुळे सरकारने आता या मुदतीत आणखी वाढ केली आहे. यापूर्वी रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची 31 मार्च ही अंतिम तारीख देण्यात आली होती. जी आता ३१ मार्च वरून ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button