कृषी बातम्या
ट्रेंडिंग

मविआ निर्णय: शेतकरी ला मिळणार कोरट्या च्या पाहिरी पासून सुटका, शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे अखेर मागे; पहा ते गुन्हे कोणते..

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) शेतकऱ्यांना कोर्टकचेरीच्या फेऱ्यातून कायमची मुक्ती देण्याचा प्रयत्न करीत आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी एका कार्यक्रमावेळी बोलताना सांगितले की, वेगवेगळ्या शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे हे लवकरच मागे घेतले जाणार आहेत याशिवाय बैलगाडा शर्यतीवर बंदी असलेल्या काळात देखील मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यत आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते हे गुन्हे देखील महाविकास आघाडी सरकार मागे घेणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री माननीय दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.

यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एवढेच नाही महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे बैलगाडा प्रेमी, बैलगाडा आयोजक, बैलगाडा मालक या सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळणार आहे.

वाचा: खुशखबर! पीक विमा योजनेअंतर्गत राज्य शासनाने खरीप हंगाम 2021 साठी विमा कंपन्यांना दिली ‘इतक्या’ कोटींची मंजुरी…

गृहमंत्री पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात तात्काळ कारवाई करण्यासाठी आदेश देखील देण्यात आले आहेत. दिलीप वळसे-पाटील श्री क्षेत्र थापलिंग देवस्थान यात्रेत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असताना याबाबत बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना तसेच बैलगाडा मालकांना संबोधित केले.

वाचा: Toll Collection : आता फास्टटॅग ची सुद्धा गरज नाही…जीपीएस ट्रॅकिंगद्वारे देशात टोलवसुली चालू होणार..

50 हजार रुपये प्रोत्साहन राशी..
त्यावेळी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील 50 हजार रुपये प्रोत्साहन राशी देण्याचे ठरवले होते. मात्र मध्यंतरी कोरोनामुळे राज्य सरकारची आर्थिक घडी विस्कटली असल्याने हे शक्य झाले नाही.

परंतु आता महाराष्ट्र सरकार लवकरच संबंधित शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हस्तांतरित करणार आहे. यामुळे नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button