ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Ginger farm| अबब! बारामतीच्या शेतकऱ्याचा जलवा, आल्याच्या शेतीतून पावणे दोन एकरात 18 लाखांचं उत्पन्न, कसं काढलं?; जाणून घ्या सविस्तर

कसं मिळवलं इतकं उत्पन्न

Ginger farm| बारामतीमधील एक शेतकरी आहे. यानं पावणेदोन एकरात 18 लाख 50 हजार रुपयांचं उत्पन्न काढलंय. ते ही आल्ल्याच्या शेतीमधून. आहे ना जबरदस्त कामगिरी! एकीकडे शेतकरी प्रचंड त्रासात आहे तर दुसरीकडे असे काही शेतकरी आहेत जे आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगानं, कल्पनाशक्तीनं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. लोकांचं लक्ष वेधून घेत असतात. इतर शेतकऱ्यांना नवनवीन मार्ग दाखवत असतात. यापैकीच एक म्हणजे बारामती तालुक्यातील निंबुत येथील शेतकरी संभाजीराव काकडे.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

काकडे यांच्या कामगिरीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काकडे यांनी प्रयोग म्हणून हे पीक घेतलं. त्यांनी पावणेदोन एकर आल्ल्याची लागवड केली. यातून 28 टन माल निघाला. दर मिळाला तो प्रतिटन 66 हजार रुपये इतका. म्हणजे पावणेदोन एकरात त्यांना तब्बल 18 लाख 50 हजर रुपये उत्पन्न मिळालं. या शेतीसाठी त्यांना खर्च आला 4 लाख रुपये. हा खर्च वजा जाता त्यांना निव्वळ नफा मिळाला आहे तो 14 लाख 50 हजार रुपये इतका.

काय म्हणाले काकडे

त्यांच्या या कामगिरीनंतर संभाजीराव काकडे हे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. ते सांगतात की, मागील दोन वर्षांपासून मी या परिसरात आल्याचं पिक घ्यायला सुरुवात केली होती. आमच्या भागात, परिसरात आल्याचं पिक घेतलं जात नाही. मात्र आम्ही आल्याचं पिक घेण्याचा निर्णय घेतला. प्रयोग करुन बघायचं ठरवलं. पहिल्या वर्षी आमचं पिक तोट्यात गेलं. पहिल्या वर्षी एक टनाला 10 ते 12 हजार रुपये इतकीच किंमत मिळाली. मात्र यावर्षी आल्याच्या पिकाला चांगला भाव आहे. त्यामुळं आमचा हा प्रयोग यशस्वी झाला.  एकसूरीपणानं शेती करत बसण्यापेक्षा वेगवेगळे प्रयोग करणं गरजेचं आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

तरुण शेतकऱ्यांसाठी संदेश

काकडे यांनी तरुण शेतकऱ्यांना तसंच सरकारलाही एक संदेश दिला आहे. यातून त्यांचं शेतीविषयी प्रेम आणि शेतकऱ्यांविषयी असलेली कळकळ दिसून येते. सरकारनं शेतकऱ्यांना हमी भाव द्यायला हवा. तरच त्याचे फायदे शेतकऱ्यांना होतील. शेतकरी शेतीपासून दूर जाणार नाही. हमी भाव नसल्यानं शेतकरी शेतीपासून दूर जात आहेत. हमी भाव दिल्यास शेतात काम करणाऱ्या मजूरांना देखील जास्त पैसे देता येतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, तरुण वर्ग शेती करण्यासाठी तयार नाहीत. ते नोकरीच्या शोधात शहरात जात आहेत. योग्य भाव मिळाला तर तरुणही शेतात नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतील असे ते म्हणाले. व्यापाऱ्यांनी योग्य भाव देऊन शेतीतूनच माल घेतला तर अनेक शेतकऱ्यांना फायदा होईल असंही काकडे म्हणाले. 

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button