कृषी बातम्या

Success Story | गडचिरोलीच्या महिला शेतकरीने दीड एकरातून केले 9 लाख रुपयांचे उत्पन्न!

Success Story |विसोरा, गडचिरोली: शिक्षण आणि शेती यांचा मिलाफ साधून गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील दीपाली खुणे या महिला शेतकरीने अविश्वसनीय कामगिरी केली आहे. दीड एकरात विविध प्रकारचा भाजीपाला पिकवून त्यांनी एका वर्षात 9 लाख रुपयांचे उत्पन्न (Lifestyle) मिळवले आहे.

बी.एससी पदवीधर असलेल्या दीपाली यांना शेतीची आवड लहानपणापासूनच होती. लग्नानंतर सासरच्या घरी धान पिकवूनही त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी भाजीपाला शेतीचा पर्याय निवडला. माहेरच्या लोकांकडून प्रेरणा घेऊन आणि कृषी शिक्षण (Lifestyle) घेऊन त्यांनी शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली.

दीपाली यांनी दीड एकरावर हंगामानुसार टोमॅटो, कारले, चवळी आणि टरबूज अशा विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड केली. बीएस्सी पदवीचा उपयोग करून त्यांनी प्रत्येक पिकावर येणाऱ्या रोगांचा अभ्यास केला आणि त्यावर उपाययोजना केल्या. रोगाची ओळख करण्यासाठी त्यांनी मोबाइल (Lifestyle) ॲपचाही वापर केला.

वाचा:Lifestyle | कपड्यांमध्ये खूप ढेकूण झालेत? ५ ट्रिक्स, ५ मिनिटांत ढेकूण गायब – एकही दिसणार नाही!

दीपाली यांची दिनचर्या सकाळी 5 वाजता सुरू होते. घरातील कामे आटोपून ते पतीसह शेतात जात आणि सायंकाळपर्यंत राबत असत. त्यांच्या मेहनतीचे आणि नियोजनाचे फलित म्हणून त्यांना यशस्वी झाल्या.

एक वर्षात मिळालेले उत्पन्न:

  • मार्च 2023 ते मे 2023: टोमॅटो – ₹3,50,000
  • जून 2023 ते ऑगस्ट 2023: कारले आणि चवळी – ₹2,00,000
  • डिसेंबर 2023 ते मार्च 2024: टरबूज – ₹3,50,000

एकूण उत्पन्न: ₹9,00,000

दीपाली यांच्या यशस्वीतेमुळे इतर महिलांनाही प्रेरणा मिळत आहे. शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून आणि मेहनत केल्यास यश नक्कीच मिळते, असा संदेश दीपाली यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button