ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Damage | राज्य शासनाचा मोठा निर्णय! आता वेगात मिळणार नुकसान भरपाईची रक्कम, थेट सुरू केलं ऑनलाईन पोर्टल

Crop Damage | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कारण आता राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी वाढत चाललेली ही दिरंगाई (Agriculture) टाळण्यासाठी आता थेट संगणकीय प्रणालीचा वापर केला जाणार आहे. चला तर मग राज्य शासनाने याबाबत काय निर्णय घेतला आहे याची माहिती सविस्तर जाणून घेऊया.

अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळण्यास दिरंगाई
अतिवृष्टीग्रस्तांना आपल्या पीक नुकसानीची (CropDamage) भरपाई मिळण्यासाठी प्रचंड वाट पाहावी लागत आहे. ज्याचं कारण म्हणजे अनेकदा पुनरावृत्ती, नावात ‍साधर्म्य, आधार क्रमांक चुकीचा असणे अशी दिली जात आहे. म्हणूनच शेतकऱ्यांना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी उशीर होत आहे.

शेती पिकांचे पंचनामे
नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना (Agricultural Information) एनडीआरएसच्या निकषानुसार मदत दिली जाते. यासाठी शेती पिकांचे स्थानिक पातळीवर पंचनामे करण्यात येतात. यानंतर हे पंचनामे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून तहसीलदाराकडे पाठवले जायचे. राज्य शासनाकडे हे सर्व जाईपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळण्यास विलंब होत होता.

काय घेतला राज्य शासनाने निर्णय?
अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळण्यास प्रचंड कालावधी लोटला जात असल्याने राज्य शासनाने थेट आता अतिवृष्टीग्रस्तांसाठी एक पोर्टल विकसित केले आहे. त्याप्रमाणे पंतप्रधान किसान योजना आणि महात्मा गांधी कर्जमुक्ती योजना यांच्यासारखी ऑनलाईन पात्रता सिद्ध करणे गरजेचे आहे. म्हणजेच आता अतिवृष्टीग्रस्तांना देखील आपली ऑनलाइन पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. यामुळे कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. तसेच ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या या सर्व प्रक्रियेत जाणारा कालावधी वाचणार असून शेतकऱ्यांना वेगाने मदत मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big decision of the state government! The victims of heavy rains will get help for damage quickly, know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button