ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop loan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीक कर्जाचे वाटप सुरू, जाणून घ्या कोणत्या पिकाला मिळणार किती कर्ज..

खरीप हंगाम 2022 करता पीक कर्जाचे वाटप सुरू झाले आहे. बऱ्याच जिल्हयांमध्ये ऑफलाइन पद्धतीने पीक कर्ज दिले जात आहेत.

Crop loan | तर बऱ्याच जिल्ह्यांत आता ऑनलाईन पद्धतीने पीक कर्जासाठी (Crop loan) अर्ज भरून घेतले जात आहेत. त्याचवेळी बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की, 3 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज (Loan) दिले जाते किंवा केसीसीच्या माध्यमातून एक हेक्टरपर्यंत कर्ज दिलं जाते. मग ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र (Agriculture) हे एक एकर आहे त्यांना किती कर्ज मिळाले पाहिजे किंवा एक हेक्टर क्षेत्र असेल तर 3 लाख रूपये कर्ज मिळेल का? तर ते मिळत नाही. चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पिक कर्ज वाटपासाठी ‘असा’ घेतला जातो निर्णय
पिक कर्ज वाटपासाठी जिल्हास्तरीय समिती असतात. त्यानंतर राज्यस्तरीय समिती असते. जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून आढावा घेतला जातो. पीक कर्ज कशाप्रकारे दिले जाईल, कुठल्या प्रकारची पिके घेतली जातात, किती मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ही सर्व माहिती राज्यस्तरीय समितीकडे पाठवली जाते. राज्यस्तरीय समिती किंवा सरकारी अधिकारी या सर्वांची समितीच्या माध्यमातून निर्णय घेतला जातो. कोणत्या जिल्ह्यामध्ये पिक कशाप्रकारे घेतले जाते, पिकाला किती खर्च येतो, त्याची किंमत देऊ शकते आणि अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो.

खरीप पिके कर्ज दर
१. खरीप भात/सुधारित ५८००० प्रति हेक्टर
२. भात उन्हाळी/बासमती ६१००० प्रति हेक्टर
३. खरीप भात (जिरायत) ४२००० प्रति हेक्टर
४. खरीप ज्वारी (बागायत) २९००० प्रति हेक्टर
५. खरीप ज्वारी (जिरायत) २७००० प्रति हेक्टर
६. बाजरी (बागायत) ३०००० प्रति हेक्टर
७. बाजरी (जिरायत) २४००० प्रति हेक्टर
८. बाजरी (उन्हाळी) २६००० प्रति हेक्टर
९. मका (बागायत) ३६००० प्रति हेक्टर
१०. मका (जिरायत) ३०००० प्रति हेक्टर
११. मका (स्विट कॉर्न) २८००० प्रति हेक्टर
१२. तूर (बागायत) ४०००० प्रति हेक्टर
१३. तूर (जिरायत) ३५००० प्रति हेक्टर
१४. मूग (जिरायत) २०००० प्रति हेक्टर
१५. मूग (उन्हाळी) १७००० प्रति हेक्टर
१६. उडीद (जिरायत) २०००० प्रति हेक्टर
१७. भुईमुग (बागायत/उन्हाळी) ४४००० प्रति हेक्टर
१८. भुईमुग (जिरायत) ३८००० प्रति हेक्टर
१९. सोयाबीन ४९००० प्रति हेक्टर
२०. सुर्यफूल (बागायत) २७००० प्रति हेक्टर
२१. सूर्यफूल (जीरायत) २४००० प्रति हेक्टर
२२. तीळ (जिरायत ) २४००० प्रति हेक्टर
२३. जवस (जिरायत) २५००० प्रति हेक्टर
२४. कापूस (बागायत) ६९००० प्रति हेक्टर २५. कापूस (जिरायत) ५२००० प्रति हेक्टर
२६. ऊस (आडसाली)१३२००० प्रति हेक्टर
२७. ऊस (पूर्वहंगामी)१२६००० प्रति हेक्टर
२८. ऊस (सुरू)१२६००० प्रति हेक्टर
२९. ऊस (खोडवा) ९९००० प्रति हेक्टर

वाचा: Bhendwal Bhavishyavani | भेंडवळच्या घटमांडणीची भविष्यवाणी जाहीर; कसा असेल पाऊस आणि पिकाला भाव?

रब्बी उन्हाळी पिके
३०. रब्बी ज्वारी ( बागायत) ३३००० प्रति हेक्टर
३१. रब्बी ज्वारी (जिरायत) ३१००० प्रति हेक्टर
३२. गहू (बागायत) ३८००० प्रति हेक्टर
३३.हरभरा (बागायत) ४०००० प्रति हेक्टर
३४.हरभरा (जिरायत) ३५००० प्रति हेक्टर
३५ .करडई ३०००० प्रति हेक्टर

भाजीपाला पिके
३६. मिरची ७५००० ३७.मिरची (निर्यातक्षम)९०००० प्रति हेक्टर
३८. टोमॅटो ८०००० प्रति हेक्टर
३९.कांदा ( खरीप ) ६५००० प्रति हेक्टर
४०. कांदा ( रब्बी ) ८०००० प्रति हेक्टर
४१. बटाटा ७५००० प्रति हेक्टर
४२. हळद १०५००० प्रति हेक्टर
४३.आले १०५००० प्रति हेक्टर
४४. कोबीवर्गीय पिके ४२००० प्रति हेक्टर

फुल पिके
४५. ऑस्टर ३६००० प्रति हेक्टर
४६ शेवंती३६००० प्रति हेक्टर
४७. झेंडू ४१००० प्रति हेक्टर
४८.गुलाब ४७००० प्रति हेक्टर
४९.मोगरा ४२००० प्रति हेक्टर
५०.जाई ३८००० प्रति हेक्टर

वाचा: Fertilizer | बाप रे! शेतीतील खतांचे दर वाढले, पण अनुदानामुळे होणार का शेतकऱ्यांच्या खिशावर परिणाम?

फळ झाडे
५१. द्राक्ष ३२०००० प्रति हेक्टर
५२. काजू १२१००० प्रति हेक्टर
५३.डाळिंब १३०००० प्रति हेक्टर
५४.चिकू ७०००० प्रति हेक्टर
५५.पेरू ६६००० प्रति हेक्टर
५६.कागदी लिंबू ७०००० प्रति हेक्टर
५७. नारळ ७५००० प्रति हेक्टर
५८. सिताफळ ५५००० प्रति हेक्टर
५९.केळी १००००० प्रति हेक्टर
६०. केळी (टिशूकल्चर) १४०००० प्रति हेक्टर
६१. संत्रा /मोसंबी ८८००० प्रति हेक्टर
६२ आंबा( हापूस ) १५५००० प्रति हेक्टर
६३.बोर ४०००० प्रति हेक्टर
६४.आवळा ४०००० प्रति हेक्टर
६५. पपई ७०००० प्रति हेक्टर

चारा पिके
६६. गजराज ३२००० प्रति हेक्टर
६७लसुन गवत ६३००० प्रति हेक्टर
६८.पवना गवत ३४००० प्रति हेक्टर
६९.मका (हिरवा चारा) ३२००० प्रति हेक्टर
७०. बाजरी (हिरवा चारा) १६००० प्रति हेक्टर
७१. ज्वारी (हिरवा चारा ) २२००० प्रति हेक्टर

इतर पिके
७२. रेशमी तुती ९०००० प्रति हेक्टर
७३. पानमळा ५५००० प्रति हेक्टर

‘या’ शेतकऱ्यांनाही मिळतय कर्ज
पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पशुपालनासाठी स्वतः भांडवल म्हणून दिले जाणारे पीक कर्ज आहे. यामध्ये गाई-म्हशीच्या खरेदीसाठी प्रति गाय 12 हजार रुपये व प्रति म्हैस 14 हजार रुपये अशा प्रकारे कर्ज दिले जाते. शेळीपालनासाठी 10 शेळ्या व एक बोकड यासाठी 12 हजार 523 रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. त्याचप्रमाणे 100 पक्षाच्या कुकुट पालनासाठी बॉयलर 8 हजार रुपये, लेयर 15 हजार रुपये तर गावठी साठी 5 हजार रुपये कर्ज दिले जाते. त्याचबरोबर मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कर्ज दिले जात आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button