ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

PM Kisan Yojana | ‘या’ अटी पूर्ण कराव्याच लागतील अन्यथा पीएस किसान योजनेच्या १४ व्या हप्त्याला शेतकरी मुकणार !

PM Kisan Yojana |देशातील शेतकऱ्यांच्या व शेतीच्या विकासासाठी सरकार अनेक योजना राबवित असते. केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना’ ( PM Kisan Scheme) सुरू केली होती. सरकारच्या अनेक महत्वकांक्षी योजनांमध्ये या योजनेचा समावेश होतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सन्मान निधी म्हणून वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात.

पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता

या योजनेचा १३ वा हप्ता काही महिन्यांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यामुळे शेतकरी सध्या अगामी १४ व्या हप्त्याची (14 th installment) वाट पाहत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

या अटी कराव्या लागतील पुर्ण

मात्र पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.
पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी खालील अटी पूर्ण कराव्या लागतील.

१) भूमी अभिलेख अद्यावत करणे
२) ई-केवायसी प्रमाणिकरण
३) बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न करणे

अगामी हप्त्यासाठी शेतकऱ्यांना या तिन्ही बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना पीएमकिसान योजनेचा १४ वा हप्ता मिळणार नाही. असे शासनाकडून (Government) स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या अटी पूर्ण कराव्यात असे सांगण्यात आले आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

अटी पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची माहिती

जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्यासो बत लिंक व्हावे यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (India post payments bank) शेतकऱ्यांचे आधार कार्ड संलग्न करण्याची मोहीम सुरू आहे. याशिवाय उर्वरित अटी म्हणजेच अभिलेख अद्यावत करणे, ई-केवायसी प्रमाणिकरण यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्राला भेट देऊ शकता.

Some demads for 14 th installment of Pm kisan yojana

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button