lang="en-US"> Smart Meter | आनंदाची बातमी ! एप्रिलपासून स्मार्ट मीटर; वाढत्या वीजबिलांवर कायमची सुटका!

Smart Meter | आनंदाची बातमी ! एप्रिलपासून स्मार्ट मीटर; वाढत्या वीजबिलांवर कायमची सुटका!

Smart Meter | Good news! Smart meters from April; Permanent relief from rising electricity bills!

Smart Meter | वाढत्या वीजबिलांमुळे त्रस्त वीजब ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एप्रिल महिन्यापासून अमरावती जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू होणार आहे. यामुळे ग्राहकांना विजेच्या (Smart Meter) खर्चावर पूर्ण नियंत्रण मिळेल आणि वाढत्या वीजबिलांवर कायमची सुटका मिळेल.

महावितरणकडून स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, ग्राहकांना विजेच्या खर्चावर पूर्ण नियंत्रण देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ग्राहक मोबाइल फोनप्रमाणेच वीज वापरण्यासाठी पैसे भरू शकतील आणि विजेसाठी किती खर्च करायचा हे निश्चित करू शकतील.

वाचा | Smart Farming | शेतीला मिळणार क्रांतिकारी बदल, पाणी, खत आणि कीटकनाशकांचा अतिवापर रोखण्यासाठी सरकारची महत्वाकांक्षी योजना

स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये:

स्मार्ट मीटरच्या (Smart Meter)अंमलबजावणीमुळे अमरावतीतील वीज ग्राहकांना अनेक फायदे मिळणार आहेत. वीजबिलांवर नियंत्रण, विजेचा अनावश्यक वापर टाळणे आणि आर्थिक बचत यासारख्या गोष्टी शक्य होतील. एप्रिलपासून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू होत असल्याने, वीज ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Web Title | Smart Meter | Good news! Smart meters from April; Permanent relief from rising electricity bills!

Exit mobile version