ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Cabinet Decision | बिग ब्रेकींग! शिंदे-फडणवीस सरकारचे धडाकेबाज निर्णय; जाणून घ्या रेशन धारकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंतचे 27 निर्णय

Cabinet Decision | राज्य शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर शासन निर्णय घेतले जातात. म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवार दिनांक 28 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक पार पडली. त्याचवेळी या बैठकीत विविध निर्णय (Cabinet Decision) घेण्यात आले आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचेसह मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळ निर्णय


✅ वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव देण्यात आले.
✅ मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाला ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव ठेवण्यात आले.
✅ राज्यात 700 ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’; 210 कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे.
✅ भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
✅ महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित राबविणार. 2 कोटी कार्ड वाटणार; आता 5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळणारं आहे. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ

✅ आता असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ. करोडो कामगारांना लाभ मिळणार आहे.
✅ नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश होणार आहे.
✅ मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे उभारणार. 100 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
✅ पूर प्रतिबंधासाठी राज्यातील 1648 कि.मी.च्या नद्यांमधील गाळ काढणार
✅ मुंबई मेट्रो-3 मार्गासाठी धारावीचा भुखंड
✅ भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण करण्यात येणार.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

✅ मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये होणार.
✅ राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र करण्यात येणार आहे.
✅ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन; पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार करण्यात येणार.
✅ बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित करण्यात आली.
✅ जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी 3552 कोटी खर्चास मान्यता देण्यात आली.
✅ राज्यात 9 ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. 4365 कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

✅ बुलडाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय होणार आहे.
✅ दीनदयाळ अंत्योदय योजना आता 143 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविणार आहे.
✅ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. 12 लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ आहे.
✅ देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता देण्यात आली.
✅ चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

✅ सर जे. जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ.
✅ पर्यटन उपविभागासाठी उप सचिव
✅ गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्यात आली.
✅ ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
✅ पाकिस्तानने पकडलेल्या मासेमारी करणाऱ्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार आहे.

Web Title: Big Breaking! Shinde-Fadnavis government’s rash decisions; Know 27 decisions from ration holders to farmers

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button