कृषी बातम्या

Latest Marathi News |ताज्या मराठी बातम्या: शेतकऱ्यांना दिलासा, कापूस-सोयाबीन उत्पादकांना 5 हजारांचे अर्थसहाय्य!

Latest Marathi News |मुंबई: स्वावलंबी आणि संपन्न शेतकरी बनवण्याचे वचन देणारे महायुती सरकार ४४ लाख कृषीपंपधारक शेतकऱ्यांना मोफत वीज आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदानाचा अपवाद वगळता अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांवर जुन्याच योजनांचा पुन्हा शिडकाव करत आहे.

योजनेची मुख्य मुद्दे:

  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा सहा हजार कोटींचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यात राबविला जाईल.
  • कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाईल.
  • कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदीसाठी 200 कोटी रुपयांचा फिरता निधी निर्माण केला जाईल.
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबांना 5 हजार 318 कोटी 47 लाख रुपये अनुदान दिले गेले आहे.

वाचा: Gas Connection KYC : अत्यंत महत्त्वाची बातमी! हे काम करा अन्यथा बंद होईल गॅस कनेक्शन, या तारखेपर्यंत आहे अंतिम मुदत

निवडणुकीतील पराभवामुळे कापूस-सोयाबीन उत्पादकांना 5 हजारांचे अर्थसहाय्य:

  • लोकसभा निवडणुकीत कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात आणि कांदा निर्यातबंदीमुळे नाशिक जिल्ह्यात महायुतीला पराभव झाला होता.
  • यामुळेच कापूस आणि सोयाबीनचे दर कोसळल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर्सपर्यंत 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे.
  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही सरकारच्या धोरणाचा फटका बसला होता, ज्यामुळे नाशिक जिल्ह्यात महायुतीला मोठा फटका बसला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button