ताज्या बातम्या

‘सकस अर्थसंकल्प’ जाहीर होणार; आरोग्यासाठी नव्या अर्थसंकल्पात १८ हजार कोटींची वाढ करण्यात येणार..

दिल्ली : १ फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री चौथा अर्थसंकल्प जाहीर करणार असून संपूर्ण देशाचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे (Budget 2022-23) लागून आहे. २०२२ च्या या अर्थसंकल्पात आरोग्य पायाभूत सुविधांबाबत सरकारकडून काही मोठ्या घोषणा केल्या जातील असा अंदाज आहे.

वाचा –

या असतील शक्यता

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे वाढते संकट पाहता या वर्षीच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असून सर्वसामान्य लोकांना चांगली आरोग्यव्यवस्था मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे. यासाठी २०२२ च्या अर्थसंकल्पमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी खालील शक्यतांचा अंदाज वर्तवला जात आहे.

वाचा –

१) आरोग्य क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदीमध्ये १८ हजार कोटी रुपयांची वाढ( Growth) होण्याची शक्यता.

२) कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीसाठी तयार केलेला निधी (Fund) यावेळीही सुरू ठेवला जाऊ शकतो.

३) आरोग्य क्षेत्राच्या बजेट मध्ये १० ते १२ टक्क्यांने वाढ होण्याची शक्यता.

पगारदारांनाही यंदा दिलासा

कोरोनाच्या काळात घरून काम केल्याने (Work from home) नोकरदार व्यक्तींच्या खर्चात वाढ झाली आहे. अशावेळी इंटरनेट-ब्रॉडबँड, टेलिफोन, फर्निचर आणि वीज देयके आधीपेक्षा जास्त आहेत. याशिवाय अनेकांचा वैद्यकीय खर्च देखील वाढलेला आहे म्हणून २०२२ च्या या अर्थसंकल्पात नोकरदार व्यक्तींना काही लाभ मिळू शकतील असे सांगितले जात आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button