lang="en-US"> साखरेच्या दरात वाढीची शक्यता! जुलैसाठी कोटा कमी, एमएसपी वाढण्याची

Sugar Quota| साखरेच्या दरात वाढीची शक्यता! जुलैसाठी साखर कोटा कमी झाल्याने आणि एमएसपी वाढण्याची शक्यता असल्याने दर वाढण्याची चिन्हे|

Sugar Quota| कोल्हापूर: केंद्र सरकारने जुलै महिन्यासाठी देशातील साखर कारखान्यांना २४ लाख टन साखरेचा कोटा दिला आहे. हा कोटा गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यातील इतकाच आहे. मात्र, यंदाच्या जून महिन्याच्या तुलनेत हा कोटा दीड लाख टन कमी आहे. यामुळे साखरेच्या दरावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

पुढील काही दिवसांत(DAYS) साखरेच्या दरात ३० ते ५० रुपये प्रति क्विंटल वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन सरकार आल्यानंतर अनेक साखर उद्योग संस्थांनी केंद्र सरकारकडे किमान विक्री मूल्य (एमएसपी) ४२०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. यामुळे एमएसपी वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम साखरेच्या दरावर होईल.

वाचा :Stock Market |भारतातील सर्वात महागडी कंपनी बनली रिलायन्स इंडस्ट्रीज, सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा विक्रमावर!

जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात साखरेचे दर चढे राहतील असा अंदाज आहे. सध्या देशात पावसाळा सक्रिय नसल्यामुळे जूनमध्ये विकल्या जाणाऱ्या साखरेचीच विक्री (sale) जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातही होईल. यानंतर साखर महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागणी वाढेल आणि दर वाढतील.

महाराष्ट्रात जुलै महिन्यात साखरेचा उठाव ( get up) वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील साखर आता राज्याबाहेरील बाजारपेठेतही पाठवली जात आहे. जूनच्या उत्तरार्धात अनेक रेल्वे रेकद्वारे साखर इतर राज्यांमध्ये पाठवण्यात आली. त्यामुळे साखरेची विक्री वाढली आहे. राज्यातील साखरेची किंमत सध्या एक्स मिल ३५०० ते ३७०० रुपये प्रति क्विंटल आहे.

Exit mobile version