ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Lemon Inflation | सामन्यांना फटका तर शेतकऱ्यांची मजा, लिंबाच्या दरवाढीने गाठला उच्चांक, जाणून घ्या काय आहेत दरवाढीची कारणं

सध्या सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. भाजीपाल्यांच्या दराबाबत तर बोलयचीच सोय राहिलेली नाही.

Lemon Inflation | एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या वाढते दर तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर पाहता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आर्थिक फटका बसत आहे. त्याचबरोबर सध्या नागरिकांना उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यामुळे नागरिक थंडगार पेय कोल्ड्रिंक्स पिण्याकडे वळत आहेत. थंडगार पेय आणि कोल्ड्रिंक्सपेक्षा लिंबाच्या (Lemon) रसापासून बनणारा सरबत शरीरासाठी फायदेशीर ठरतो. यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात सरबतही पितात. सरबत ही घरगुती बनवण्याची गोष्ट असल्यामुळे नागरिकांना ही सोपी पडते. मात्र, वाढता उन्हाळा एकीकडे आणि दुसरीकडे लिंबाचे दर देखील गगनाला भिडत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात नक्की लिंबू दरवाढ कशामुळे आहेत.

सध्या राज्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे शेतीसाठी (Agriculture) पाण्याची कमतरता देखील मोठ्या प्रमाणात भासत आहे. म्हणूनच अनेक पिके जळून खाक देखील होताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर पाण्याची कमतरता भासल्यामुळे शेतीतील पिकांमधून भरघोस उत्पन्न देखील निघत नाही.

वाचा: Crop Insurance | रब्बी हंगामातील 2017-18 चा शेतकऱ्यांसाठी तब्बल 15 कोटी 71 लाखांचा पिक विमा मंजूर, ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

सध्या किती आहे लिंबाचे दर?
राज्यात लिंबू दरवाढीने उच्चांक गाठला आहे. कारण सर्वसामान्य नागरिकांना प्रति किलो लिंबासाठी तब्बल 350 ते 400 रुपये मोजावे लागत आहेत.लिंबू दरवाढीचा केवळ सामान्यांनाच फटका बसत नसून दुकानदारांना देखील त्याचा फटका बसत आहे. सरबत पिण्यासाठी 350 ते 400 रुपये किलोचे लिंबू खरेदी करण्यापेक्षा दुकानात जाऊन सरळ सरबत पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

लिंबाच्या दरात का होत आहे वाढ?

• उष्णतेमुळे उत्पादनात होत आहे घट
खरं तर, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या भागात लिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. नेमके याच भागामध्ये सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. याच उष्णतेचा लिंबाच्या पिकावर उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येत आहे. सध्या सोसाट्याचा वारा सुटत असल्यामुळे लिंबू येण्यापूर्वी येणारी फुले गळून पडत आहेत. याचा परिणाम थेट उत्पादनावर होत.

वाचा: खरचं की काय? आता भारतातील ताजी केळी आणि बेबी कॉर्न थेट कॅनडाच्या बाजारात, शेतकरीही होणार मालामाल

वाहतुकीसाठी लागणारा खर्च वाढला
राज्यात पेट्रोल डिझेलचे दर स्थिर नसल्यामुळे देखील याचा परिणाम लिंबाच्या दरावर होत आहे. कारण वाहतुकीसाठी लागणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे लिंबाची वाहतूक करण्यासाठी देखील जास्त पैसे मोजावे लागत आहेत. ज्याचा परिणाम लिंबाच्या किमतीवर होत आहे.

उत्पादन कमी व मागणी जास्त
सध्या लग्नसराईचा सिझन देखील सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लिंबाची मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे कडक उन्हाळा जाणवत असल्यामुळे नागरिकांकडून सरबतासाठी लिंबाची मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. एकीकडे लिंबाची वाढती मागणी आणि दुसरीकडे उत्पादन कमी असल्यामुळे लिंबाच्या दरामध्ये वाढ होत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button