lang="en-US"> Farmer Loan | वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, व्याज माफ! - मी E-शेतकरी

Farmer Loan | वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, व्याज माफ!

मुंबई: वेळेत आणि मुदतीच्या आतमध्ये पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmer Loan)मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकांना अशा शेतकऱ्यांकडून केवळ मुद्दल रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की, अशा शेतकऱ्यांना व्याज भरावे लागणार नाही.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना(Farmer Loan) लाभ होणार आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून कर्ज वसूलीसाठी मोठ्या प्रमाणावर तगादा लावण्यात येतो. मात्र, या नवीन निर्देशानुसार(Farmer Loan) वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना या तगाद्यापासून मुक्तता मिळणार आहे.

महाराष्ट्र शासनाने 18 जून 2007 रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 अ मधील अधिकारांचा वापर करून हे निर्देश दिले आहेत. या निर्देशांनुसार, पीक कर्जाची विहित मुदतीपूर्वी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून फक्त कर्ज मुद्दल रक्कमेची वसूली करावी. तसेच, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदानाचा आगाऊ लाभ देण्यात यावा आणि पुढील पीक कर्जासाठी पात्र ठरविण्यात यावे.

सहकार विभागाकडून या सूचना पुन्हा एकदा सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषि पतपुरवठा संस्थांना पाठवण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि वेळेत कर्ज फेडण्यास प्रोत्साहन मिळेल.

Exit mobile version