ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

पुढील 24 तासांत सोसाट्याच्या वाऱ्यासह “या” ठिकाणी पाऊस; हवामान खात्याने दिला सावधानतेचा इशारा..

Rain in "this" place with gusts of wind for the next 24 hours; Meteorological department issued a warning.

राज्यात सध्या हवामानात (Weather) सतत बदल होत आहेत. या दिवाळीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान (Weather) खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर आणखी वाढला असल्यानं त्याचा परिणाम आता कोकण किनाऱ्यावर होत आहे. उत्तर कोकण ढगाळ वातावरणासह मुंबई, ठाणे, पालगर, नाशिक, रायगड आणि पुण्यात वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

वाचा

8, 9, 10 नोव्हेंबर ला कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भात सोसाट्याचा वारा सुटण्याची लक्षणे आहेत. तुरळक पाऊस राहील व हवामान (Weather) कोरडे राहण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

ढगाळ वातावरणासह वादळी वाऱ्याची शक्यता –

गेल्या 24 तासांत कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुढील 48 तासांत त्याची तीव्रता कमी होणार आहे. कोकणात आणखी दोन दिवस काही ठिकाणी तुरळक अरबी समुद्र, पावसाची शक्यता, ढगाळ वातावरण, वादळी वाऱ्याची शक्यता, कोकण, पावसाची शक्यता आहे.

वाचा –

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जर पाऊस झाला तर रब्बीच्या पेरण्या लांबणीवर जातील त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button