ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Forecast |शेतकऱ्यांनो काळजी घ्या! ‘या’ राज्यातील भागात पुढील २ दिवसात गडगडाटासह पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवला आहे.

Weather Forecast | जोरदार गारपीट आणि वादळ वाऱ्यासह पावसाने अनेक राज्यांत हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके कोलमडून पडली आहेत. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या जीवाची घालमेल सुरू आहे. असे असतानाच काही राज्यांमध्ये पावसाचा मुक्काम आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने (Weather News) वर्तवली आहे.

राज्यात पावसाची शक्यता

राज्यात काही ठिकाणी थंडीचा जोर दिसतोय. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. ऋतुचक्र हे चक्र समजेनासे झाला आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पुढील २ दिवसात हलके ते गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच इतर राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

कुठे पडणार पाऊस?
गेल्या काही दिवसांपासून उमराळे (जि. नाशिक), आवई, परभणी, नंदुरबार आणि धुळे या राज्यांतर्गत भागात गारपीट झाली आहे. पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडांसह पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.

शनिवारी हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात गारपिट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये २० मार्च पर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोराचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button