योजना

Crop Insurance News | बातमी कामाची! यंदाही शेतकऱ्यांना अवघ्या एका रुपयात पीक विमा; जाणून घ्या अंतिम तारीख…

Crop Insurance News | आजपासून (१८ जून) शेतकऱ्यांसाठी विमा भरण्यास सुरुवात

केवळ १ रुपयात विमा संरक्षण!

पुणे, १८ जून २०२४: खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना २०२४ आजपासून (१८ जून) शेतकऱ्यांसाठी खुली झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना https://www.pmfby.gov.in या अधिकृत पोर्टलवरून अर्ज करता येईल.

योजनेचे मुख्य मुद्दे:

  • विमा शुल्क: गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ १ रुपया भरावा लागणार आहे.
  • विमा भरण्याची अंतिम मुदत: १५ जुलै २०२४
  • समाविष्ट पिके: भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे आणि कांदा या १४ पिकांचा या योजनेत समावेश आहे.
  • ई-पीक पाहणी आवश्यक: शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणी मध्ये करणे आवश्यक आहे.
  • आवश्यक कागदपत्रे: आधार क्रमांक, बँक पासबूक, ७/१२ उतारा आणि पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र.

वाचा:Krashula plant |घरात लावा क्राशूला, सुख-समृद्धी येईल!

योजनेत सहभागी कसे व्हावे:

  • अधिसूचित क्षेत्रातील शेतकरी:
    • ज्यांनी पीक कर्ज घेतले आहे त्यांच्यासाठी विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही.
    • ज्यांनी कर्ज घेतलेले नाही त्यांनी ७/१२ उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र यासह प्राधिकृत बँकेत किंवा CSC मध्ये विमा भरू शकतात.
  • अधिक माहितीसाठी:
    • कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन: १४४४७
    • संबंधित विमा कंपनी
    • स्थानिक कृषी विभाग कार्यालय

शेवटची मुदत: १५ जुलै २०२४

शेतकऱ्यांनी त्वरित विमा भरून आपली पिके विमा संरक्षणाखाली आणा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button