lang="en-US"> PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचे 2 हजार, पाहा तुम्हाला मिळणार का?

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचे 2 हजार, पाहा तुम्हाला मिळणार का?

PM Kisan Yojana | केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) ही एक महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक (Financial) मदत दिली जाते. हे पैसे तीन हफ्त्यांमध्ये 2000 रुपये प्रति हफ्ता अशा स्वरूपात जमा केले जातात.

16 वा हफ्ता फेब्रुवारीत जमा
योजनेचा 16 वा हफ्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता शेतकरी 17 व्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

वाचा| दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांची वाट, ६० हजारांची यादी अपलोड, ४.५ लाखांची बाकी!

जून-जुलैमध्ये 17 वा हफ्ता
पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता जून किंवा जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

ई-केवायसी आणि जमिनीची नोंदणी बंधनकारक
17 व्या हफ्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे आणि जमिनीची नोंदणी करणे बंधनकारक आहे. असे न केल्यास शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

शेतकऱ्यांसाठी आवाहन:
17 व्या हफ्त्यासाठी ई-केवायसी आणि जमिनीची नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करा.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Exit mobile version