ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

PM Kisan Yojana | पीएम किसानच्या ई-केवायसी प्रक्रियेत मुदतवाढ, ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये

PM KisanYojana | पीएम किसान सन्मान निधीच्या 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना सरकारने पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. सरकारने ई-केवायसीची (E-KYC) शेवटची तारीख दोनदा वाढवूनही तुम्ही हे काम केले नसेल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. होय, सरकारच्या कृषी (Agriculture) आणि शेतकरी कल्याण विभागाने e-KYC (PM Kisan e-kyc) ची अंतिम तारीख 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही तारीख 31 जुलै होती. फार कमी शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केले आहे, त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा तारीख वाढवली आहे.

पुन्हा वाढणार का तारीख?
आता शेवटची तारीख वाढण्याची शक्यता कमी
असून, ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून 12 वा हप्ता दिला जाणार नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. म्हणूनच ही प्रक्रिया करणे आवश्यक आहे. सरकारने 31 मार्च ही e-kyc ची तारीख निश्चित केली होती. त्यानंतर ती वाढवून 31 मे आणि 31 जुलै करण्यात आली. आता ती वाढवून 31 ऑगस्ट करण्यात आली आहे. यानंतर अंतिम तारीख वाढण्याची शक्यता कमी आहे.

वाचा: पुढचे 4 दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, शेतकऱ्यांनो जाणून घ्या धरणांची स्थिती

बाराव्या हप्त्यात मिळणारं 4 हजार रुपये?
पीएम किसान निधीच्या 12 व्या हप्त्यासाठी पैसे ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान येतील. 12 वा हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो, असा दावा सूत्रांनी केला आहे. यापूर्वी 31 मे रोजी पीएम मोदींनी पीएम किसानचे 2-2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले होते. ज्या शेतकऱ्यांना 11व्या हप्त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना यावेळी 12वा हप्ता म्हणून 4 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

वाचा: धक्कादायक! प्रेमसंबंध आले जीवाशी, जळगावात दुहेरी हत्याकांडाने खळबळ, सख्ख्या भावानेच बहिणीचा केला

केवायसी प्रक्रिया

केवायसी करण्यासाठी, प्रथम पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर pmkisan.gov.in वर जा.
येथे शेतकऱ्याच्या कोपऱ्यात, माऊस ओव्हर करा आणि E-KYC टॅबवर क्लिक करा.
उघडणाऱ्या नवीन वेब पेजवर, आधार क्रमांक टाका आणि शोध टॅबवर क्लिक करा.
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.
OTP सबमिट केल्यानंतर येथे क्लिक करा.आधार नोंदणीकृत मोबाइल ओटीपी प्रविष्ट करा आणि तुमचे ई-केवायसी झाले.

काय आहे पीएम किसान सन्मान निधी योजना?
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देण्याची तरतूद आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी दिली जाते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: PM Kisan’s e-KYC process extended these farmers will get Rs 4 thousand

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button