योजना

Crop insurance |1 रुपयात उतरवा पीकविमा अन्‌ मिळवा 20,000 ते 81,000 भरपाई! विमा भरण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत; शेतकऱ्यांना भरता येईल ‘या’ संकेतस्थळावरून अर्ज

Crop insurance | सोलापूर, 20 जून 2024: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी विमा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या वर्षीही शेतकऱ्यांना फक्त एका रुपयात पिकाचा विमा मिळणार आहे.

14 पिकांसाठी विमा सुविधा:

योजनांमध्ये भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भईमूग, तीळ, कारळे आणि कांदा या 14 पिकांचा समावेश आहे.

विमा भरण्याची मुदत:

या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी आवाहन केले आहे.

वाचा: Orchard |मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीचे वेळापत्रक जाहीर!

कोण घेऊ शकतो विमा?

अधिसूचित क्षेत्रातील सर्व शेतकरी, कुळाने किंवा भाड्याने शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. पीककर्ज घेणारे आणि न घेणारे दोन्हीही शेतकरी यात सहभागी होऊ शकतात.

भाडेपट्ट्यावरील जमिनीसाठी काय?

भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करणे आवश्यक आहे.

ई-पीक पाहणी ॲप वापरा:

शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणी ॲपवर करावी.

महत्त्वाची माहिती:

  • आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढल्यास तो रद्द होऊ शकतो.
  • विमा घेतलेले पीक शेतात नसल्यास विमा भरपाई मिळणार नाही.
  • भात, कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन निश्चिती केली जाईल.

विमा भरपाई:

  • विमा संरक्षणामध्ये पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीतील उत्पादनात घट, नैसर्गिक आपत्ती आणि इतर नुकसानीचा समावेश आहे.
  • विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता पीकानुसार बदलतो. (वरील सारणी पहा)

अर्ज कसा करावा:

  • शेतकरी प्राधिकृत बँक, CSC केंद्रांमधून किंवा www.pmfby.gov.in या वेबसाइटवरून विमा भरू शकतात.
  • अर्जासोबत सातबारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणा आवश्यक आहे.
  • आधार क्रमांक आणि बँक खाते आधारशी संबंधित असणे आवश्यक आहे.
  • विमा भरण्यासाठी CSC कर्मचाऱ्यांना 1 रुपया आणि बँकेला शुल्क द्यावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button