ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
फळ शेती

Orange | संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट! संत्रा बागांवर ‘या’ किडीचा प्रादुर्भाव, थेट उत्पादनात होणारं घट

Orange | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न काही संपत नाहीत. कधी अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होते, तर कधी शेतमालाला योग्य भाव बाजारात मिळत नाही. त्याचवेळी बदलत्या हवामानामुळे (Weather) नागपूर जिल्ह्यातील संत्रा बागांवर किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे संत्रा बागा अडचणीत आल्या आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील सुमारे 30 ते 40 टक्के संत्रा बागांवर कीड (Orange Garden Pest) आणि कोळशी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या संत्रा उत्पादक शेतकरी (Department of Agriculture) संकटात सापडला आहे. त्यामुळे आपले मोठे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र संत्री लागवड
महाराष्ट्रात एक लाख 27 हजार हेक्टर क्षेत्रात संत्र्याची लागवड केली जाते. नागपूरची संत्री राज्यात सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. नागपूर हे ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. भारतात संत्र्याची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात केली जाते.

संत्रा फळावर कोळशीचा नेमका रोग काय?
कोळशी हा रोग काळ्या माशीमुळे होतो. काळी माशी संत्र्याच्या पानांचा रस शोषते. संत्र्याच्या पानावर असताना माशी काळ्या रंगाचे स्राव उत्सर्जित करते. संत्र्याची पाने काळ्या आच्छादनाखाली वरून झाकलेली असतात, शेवटी पानांवर काळा थर साचल्यामुळे झाडांची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया थांबते, परिणामी संत्र्याची झाडे गळायला लागतात.

कृषी विभागाकडून मिळाले नाही मार्गदर्शन
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात विशेषतः नागपूर व अमरावती जिल्ह्यात पिकांवर कोळशी रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे फळबागांमध्ये अंधार दिसू लागला आहे.आता संत्रा बागेतील संत्रा काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व छोटे संत्रा व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मात्र कृषी विभाग अद्यापही निष्क्रिय, कृषी विभागाकडून मदत न मिळाल्याने शेतकरी निराश झाला आहे.

संत्रा शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
नागपूर आणि अमरावती हे दोन जिल्हे संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र येथील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. एकीकडे रोगराईचा प्रादुर्भाव आहे. तर दुसरीकडे या लहान आकाराच्या संत्र्यांना खरेदीदार मिळत नसल्याने या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकीकडे लहान आकाराची संत्री फेकून द्यावी लागत आहे. दुसरीकडे बांगलादेशने भारतीय संत्र्यावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे महाग होऊनही बांगलादेशातील वैदर्बी संत्र्याचा पुरवठा बराच कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: A big crisis for orange farmers! Infestation of insect on orange orchards, direct reduction in yield

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button