ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

पुणे जिल्ह्यातील सर्व कारखान्यांपैकी या कारखान्याकडून FRP सर्वांत जास्त, प्रतिटन ऊसाला मिळणार इतकी FRP

Out of all the factories in Pune district, this factory has the highest FRP per ton of sugarcane

सोमेश्वर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने गाळप केलेल्या उसाला प्रति टन 2867 रुपये एकरकमी एफआरपी (FRP) देण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांमधील (Sugar factory) ही एफआरपी (FRP) सगळ्यात जास्त ठरणार आहे.

वाचा –

गळीत हंगामात सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम 22 ऑक्टोबरला सुरू झाला. सगळे काम सुरळीत होण्यास एक नोव्हेंबर उजाडली. त्यानंतर अवघ्या महिनाभरात सोमेश्वर कारखान्याने गाळपाचा दोन लाख टनाचा टप्पा ओलांडला आहे. एफआरपी 1 रकमी मिळणार की दोन टप्प्यात विभागून मिळणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये (farmers) उत्सुकता होती. सोमेश्‍वर कारखान्याच्या निर्णयावर बाकीच्या आजूबाजूच्या कारखान्यांचे निर्णय अवलंबून असल्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांचे सोमेश्‍वर कारखान्याच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते.

वाचा –

सोमेश्वर कारखान्याने ही एक रकमी एफआरपी जाहीर करून शेतकर्‍यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. गाळप झालेल्या पहिल्या पंधरवाड्यात ची रक्कम दहा डिसेंबर पर्यंत सभासदांच्या खात्यावर जमा होण्यासाठी कारखाना व्यवस्थापन संपूर्ण प्रयत्नशील आहे.

सोमेश्वर कारखान्याने एकरकमी दिल्याने अन्य कारखान्यांनाही त्या प्रकारचा निर्णय घ्यावा लागणार आहे अशी चर्चा आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button