कृषी बातम्या

तब्बल ४०० रुपये किलो किंमतीत विकला जातो ‘हा’ सेंद्रिय टोमॅटो; याचे वर्षभर घेता येते उत्पादन..

सध्या देशभरात सेंद्रिय शेतीचे (Organic farming) विविध प्रयोग सुरू आहेत. रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने लोकांच्या व शेतीच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे घटक असल्याने सेंद्रिय शेतीवर जास्त भर दिला जातोय. अशातच मध्यप्रदेश येथील जबलपूर मधील शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीमधून ४०० रुपये किलोचा टोमॅटो पिकवला आहे.

वाचा –

१२ महिने घेता येते उत्पादन

जबलपूर मधील अंबिका पटेल या शेतकऱ्यांने पॉलिहाऊस मध्ये या नव्या वाणाच्या टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. हा टोमॅटो चेरीसारखा दिसत असून १२ महिने या टोमॅटोचे उत्पादन सुरूच असते. हे टोमॅटो आकाराने लहान असतात व इतर टोमॅटोंच्या तुलनेत ते आंबट देखील असतात. या टोमॅटोसाठी भरपूर ठिकाणांहून मागणी (Demand) येत असून याची पॅकिंग ही निराळ्या पद्धतीने केली जाते.

वाचा –

आरोग्यदायी टोमॅटो (Healthy tomato)

चेरी पद्धतीच्या या टोमॅटोमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त आशा खालील गोष्टी आहेत

१) या टोमॅटो मधून उच्च जीवनसत्व मिळतात.

२)यामध्ये प्रोटीन (Protein)आणि फायबर्स चे प्रमाणही जास्त आहे.

३) सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्यामुळे कोणत्याही विषारी रासायनिक घटकांचा धोका नाही

४) शरीरास आवश्यक पोषकतत्त्वे (Nutrients)यात उपलब्ध आहेत.

या कारणांमुळे या मध्यप्रदेश मधील शहरांमध्ये या टोमॅटोच्या मागणी मध्ये वाढ (Growth) होताना दिसून येत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button