ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Online Ration Card | आता 30 दिवसांत घरबसल्या काढा नवीन रेशनकार्ड! फक्त ‘या’ लिंकवर करा अर्ज; जाणून घ्या प्रक्रिया

Get a new ration card now at home! Apply at 'this' link only; Know online application process

Online Ration Card | भारतात रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड (Online Ration Card) आवश्यक आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार गरीब कुटुंबांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ पुरवते. तसेच रेशन कार्ड (Online Ration Card process) आयडी प्रूफ आणि अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणूनही वापरले जाते. मागील काही वर्षांपासून सरकारने रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे नागरिकांना रेशन कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून ते सहजपणे मिळवता येते.

  • ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया
  • https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx
  • महाराष्ट्र शासनाच्या महाफूड पोर्टलवर Public Login वर जा.
  • Register बटणावर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती भरा आणि Submit करा.
  • आपल्याला एक OTP येईल. तो OTP भरा आणि Login करा.
  • New Ration Card टॅबवर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती भरा आणि Submit करा.
  • आपला अर्ज सादर झाला असल्याचा मेसेज येईल.

वाचा : Ration Card | नागरिकांसाठी आनंदाची बातमी! आता रेशन कार्डशी संबंधित सर्व कामे करता येणार ऑनलाइन; जाणून घ्या एका क्लिकवर

  • अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • जन्मदाखला (18 वर्षांखालील मुलांसाठी)
  • विवाह प्रमाणपत्र (विवाहित व्यक्तींसाठी)
  • रहिवासी प्रमाणपत्र

शुल्क
ऑनलाईन रेशन कार्डसाठी 33.60 रुपये इतके नाममात्र शुल्क भरावे लागते.

सेवा कालावधी
ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर 30 दिवसांच्या आत कार्ड मिळते.

तक्रार
जर तुम्हाला रेशन कार्ड मिळण्यास विलंब झाला किंवा अर्जात काही त्रुटी आढळली तर तुम्ही महाफूड पोर्टलवर PG Programs Entrygrv टॅबवर जाऊन तक्रार करू शकता. https://mahafood.gov.in/pggrams/Entrygrv.aspx

हेही वाचा :

Web Title: Get a new ration card now at home! Apply at ‘this’ link only; Know online application process

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button