lang="en-US"> Onion Rate | अर्रर्र..! कांदा निर्यातीमुळे दर घसरले; कांदा उत्पादकांना मोठा फटका, पाहा किती मिळतोय भाव?

Onion Rate | अर्रर्र..! कांदा निर्यातीमुळे दर घसरले; कांदा उत्पादकांना मोठा फटका, पाहा किती मिळतोय भाव?

Onion Rate | Arrrr..! Prices fell due to onion exports; Big hit to onion producers, see how much the price is getting?

Onion Rate | कांदा निर्यातबंदी होऊन दोन महिने उलटूनही अजूनही निर्यातबंदी उठवण्यात आली नाही. त्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घसरले आहेत. सध्या कांदा किमान ६०० रुपये, कमाल १३०० रुपये आणि सरासरी ११०० रुपये क्विंटलने विकला जात आहे.

कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. कमी दरात कांदा विकल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसेच येत नाहीत.

दुसरीकडे, कांद्याच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक नाशिक जिल्ह्यात दाखल झाले आहे. पण बाजारभावात घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

वाचा | Garlic Price | लसूण उत्पादक शेतकरी मालामाल!लसणाच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या किलोला किती मिळतोय भाव?

ऑक्टोबरच्या अखेरीस आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाला मोठे नुकसान झाले होते. यानंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी समिती दोनदा महाराष्ट्र दौऱ्यावर आली होती.

SBI | तुम्हालाही ‘या’ नंबरवरून फोन येतोय? बँक खाते रिकामे होण्याचे आहेत संकेत, SBI चा ग्राहकांना सतर्कतेचा इशारा

मात्र, शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. आता तिसऱ्यांदा दौऱ्यावर आलेल्या समितीकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या:

Web Title | Onion Rate | Arrrr..! Prices fell due to onion exports; Big hit to onion producers, see how much the price is getting?

Onion Rate | Arrrr..! Prices fell due to onion exports; Big hit to onion producers, see how much the price is getting?

Exit mobile version