ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

One Country One Election | “एक देश एक निवडणूक” कमी होईल नागरिकांची पिडवणूक’ ! ऐन निकलादिवशीचं मुख्य आयुक्तांच ‘हे’ महत्त्वाचं विधान चर्चेत…

One Country One Election | : देशातील महत्त्वाच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका (Election) नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांचा आज निकाल लागणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याच दरम्यान देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी ‘एक देश एक निवडणूक’ हा नवा पर्याय मांडला आहे.

असा होईल एकत्रित निवडणुकीचा फायदा

एक देश एक निवडणूक हा देशासाठी एक चांगला पर्याय आहे. पण हा पर्याय अंमलात आणण्यासाठी राज्यघटनेत (constitution) बदल करण्याची गरज आहे. असे विधान देशाचे मुख्य आयुक्त सुशील चंद्रा यांनी केले आहे. एकत्रित निवडणुका खालील प्रमाणे फायदेशीर ठरतात,

तणांचा व कीडयांचा उपद्रव कमी करण्यासाठी अशा रित्या करा उन्हाळी मशागत ! जाणून घ्या सविस्तर माहिती…

१) सततच्या निवडणुकांमुळे देशावर मोठा आर्थिक बोजा पडतो. निवडणुका घेणे ही आर्थिकदृष्ट्या न परवडणारी प्रक्रिया असते आणि दिवसेंदिवस ती अधिकच खर्चिक होत चाललीय. एकाच वेळी सर्व निवडणुका घेतल्यास या खर्चात मोठी बचत होऊ शकणार आहे.

२) एकत्रित निवडणुका घेतल्यास राजकीय पक्षांना त्यासाठी सतत निधी उभारण्याची गरज भासणार नाही. तसं झाल्यास निधी उभारण्यासाठी राजकीय पक्षांकडून वापरले जाणारे हातखंडे कमी होतील.

३) निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळण्यास सरकारला जास्तीत जास्त वेळ मिळेल.

४) एकत्रित निवडणुकांमुळं मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यताही आहे.

या आधीही आणली होती ही संकल्पना

१९९९ साली केंद्रात वाजपेयी सरकार असताना विधी आयोगाने देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस आपल्या अहवालात केली होती. त्यावेळी ही शक्यता पहिल्यांदा चर्चिली गेली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या संकल्पनेला उचलून धरले. परंतु एकत्रित निवडणूक ही प्रचंड गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याने हा मुद्दा व्यापक पातळीवर चर्चेला घेतला गेला न्हवता. सध्या मुख्य आयुक्त सुशील चंद्रा यांच्या वक्तव्याने या मुद्दा पुन्हा नव्याने चर्चेत येण्याची शक्यता आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button