ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Ration Card | यंदाचा गुढीपाडवा होणार गोड! राज्य शासन 100 रुपयांत देणारं आनंदाचा शिधा, ‘या’ 14 जिल्ह्यांना मिळणार लाभ

Ration Card | सामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सामान्य नागरिकांची गोर गरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून केवळ 100 रुपयांत दिवाळीचे पॅकेट मिळण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे कोट्यवधी रेशन कार्ड (Ration Card) धारकांची दिवाळी गोड झाली. त्याचबरोबर आता रेशन कार्डधारकांचा (Ration Card) गुढीपाडवा गोड व्हावा म्हणून आता गुढीपाडव्याला आणि 14 एप्रिल आंबेडकर जयंती निमित्त 100 रुपयांचा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. याबाबतच मोठी माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण शासन निर्णय
राज्यातील 1 कोटी 58 लाख शिधा धारकांना गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून 100 रुपयांचा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. याच संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय हा 16 मार्च 2023 रोजी घेण्यात आला आहे. त्याचवेळी कोणत्या जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड धारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे याबाबत निर्णय घेण्यात आला.

कोणत्या जिन्ह्यांना मिळणार लाभ?
राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना हा लाभ मिळणार आहे.

काय मिळणार?
रेशन कार्ड धारकांना 1 किलो या प्रमाणात रवा, हरभरा डाळ, साखर आणि 1 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा मिळणार आहे. यामुळे यंदा सामान्यांचा आणि शेतकऱ्यांचा गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंती गोड होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 22 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आला होता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: This year’s Gudipadwa will be sweet! Anand ration given by the state government at Rs 100 14 districts will get benefit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button