कृषी बातम्याकृषी सल्ला

Kharif Season|नाशिक: खरीप हंगामासाठी एक रुपयात पीक विमा योजना, शेतकऱ्यांनी 15 जुलैपर्यंत नोंदणी करा!

Kharif Season|नाशिक, 30 जून: खरीप हंगामासाठी (2024-25) शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना लाभणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 15 जुलैपर्यंत राष्ट्रीय पीक विमा पोर्टल https://www.pmfby.gov.in/ यावर नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक (press release) जारी केले आहे.

भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसाठीही विमा सुविधा:

या योजनेत भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही सहभागी (Participant) होऊ शकतात. यासाठी त्यांना नोंदणीकृत भाडेकरार पोर्टलवर अपलोड करणे गरजेचे आहे. आपले सरकार सुविधा केंद्र (सीएससी) धारकांना पीक विमा कंपनीकडून प्रतिअर्ज रक्कम ₹40 मध्ये मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही

वाचा :For women in Maharashtra: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना: आर्थिक सशक्तीकरणाचा एक पाऊल!

कोणत्या पिकांसाठी विमा:

भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कपाशी आणि खरीप कांदा यासह इतर अधिसूचित (notified) पिकांसाठी मंडळ आणि तालुका स्तरावर पीक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

विमा भरण्यासंबंधी सूचना:

  • ऑनलाइन सेवा केंद्र आणि आपले सरकार (Govt) सेवा केंद्रांमधील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावात आधार क्रमांक, सातबारा आणि बँक पासबुक यासारख्या कागदपत्रांमध्ये किरकोळ बदल असल्यास त्यांचा विमा हप्ता स्वीकारावा.
  • विमा भरपाई मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी वेळीच नावातील दुरुस्ती करून घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button